शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलिंग सुरू; २0 मदत केंद्रे

By admin | Updated: September 14, 2015 23:52 IST

दत्तात्रय शिंदे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाड्यांची तपासणी न करण्याचा निर्णय

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, वाहतुकीस अडथळा व गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सोमवारपासून महामार्गावर पेट्रोलिंग सुरु केले असून २० ठिकाणी पोलीस मदत केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत, अशी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मदत केंद्रामधून ३५ अधिकारी व १४५ कर्मचारी २४ तास सेवा बजावणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही गणेश भक्ताच्या वाहनांची तपासणी केली जाणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सी.आर.पी.एफ. चे ६० जवान व २५० होमगार्ड जिल्ह्यात दाखल झाले असून आर.सी.पी.चे ४ प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स व शीघ्र कृती दल तैनात केली आहेत. गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना याविषयी माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश पालवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वजीत कार्इंगडे, पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे उपस्थित होते. यावेळी माहिती देताना दत्तात्रय शिंदे म्हणाले, सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण आहे. या सणासाठी सिंधुदुर्गातीलच मात्र नोकरीनिमित्त मुुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये वास्तव्यास असणारे गणेशभक्त या निमित्ताने जिल्ह्यात दाखल होतात. या गणेश भक्तांना वाहतुकीदरम्यान कोणतीही गैरसोय अथवा अडथळा होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली असून खारेपाटण ते पत्रादेवी या दरम्यान २० पोलीस मदतकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यासाठी ३५ अधिकारी व १४५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच महामार्गावर १० जीप ठेवण्यात आल्या असून त्यामार्फत पेट्रोलिंग व ७ मोटारसायकलमार्फत पेट्रोलिंग करण्यात येत आहे. दहा जीप, सात मोटार सायकल मदत केंद्रांप्रमाणेच जिल्ह्यात ठिकठिकाणी पेट्रोलिंग मोहिम सुरु करण्यात आले आहे. यासाठी १० जीप व ७ मोटारसायकल तैनात करण्यात आले असून महामार्गाप्रमाणेच घाटामार्गामध्येही पेट्रोलिंग करण्याचे काम सुरु झाले आहे. कोकणातील सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनदेखी शिंदे यांनी केले. (प्रतिनिधी)