कणकवली : उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा मागे घेऊन काँग्रेसमध्ये सक्रिय काम करणार असल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नारायण राणे उद्या, गुरुवारपासून सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा प्रारंभ ते सावंतवाडीतून करणार आहेत.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत पंधरा दिवसांपूर्वी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत बंड पुकारले होते. मात्र, काल, मंगळवारी त्यांची समजूत काढण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्या आगामी वाटचालीबाबत माहिती दिली होती. सावंतवाडीतून प्रारंभनारायण राणे आगामी काळात काँग्रेस वाढविण्याच्या दृष्टीने आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याचा प्रारंभ उद्या सावंतवाडीतून होत आहे. सावंतवाडीत दुपारी तीन वाजता कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
राणेंच्या राज्यव्यापी दौऱ्यास आजपासून प्रारंभ
By admin | Updated: August 7, 2014 00:22 IST