शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात पॅनकार्डधारकांचा ठिय्या

By admin | Updated: October 27, 2016 23:22 IST

ठेवीदार आक्रमक : परतावा मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा, कंपनीच्या हॉटेलमध्ये पर्यटकांना रोखले

मालवण : पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड या कंपनीत जिल्ह्यातील ठेवीदारांची परतावा मुदत संपली असतानाही परतावा न देण्यात आल्याने आक्रमक बनलेल्या मालवणातील ठेवीदारांनी गुरुवारी सकाळपासून हॉटेल सागर किनारा येथे बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात ठेवीदार व मार्केटींग एजंटही सहभागी झाले आहेत. जोपर्यंत ‘पॅनकार्ड’कडून रक्कम परतावा स्वरुपात दिली जाणार नाही, तोपर्यंत बेमुदत ठिय्या सुरूच राहील, असा एकमुखी निर्धार ठेवीदारांनी केला आहे. ठेवीदारांनी पॅनकार्डविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्हांला तारखा नको, जमा केलेली रक्कम मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ठेवीदारांनीनी कंपनीच्या दोन्ही हॉटेलमध्ये ठाण मांडले. यावेळी हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या पर्यटक व ग्राहकांना प्रवेश करण्यास अटकाव केला जात होता. सायंकाळी उशिरापर्यंत कंपनीकडून ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलन सुरुच होते. पॅनकार्डने ठोस भूमिका घेतल्यास व परतावा न दिल्यास पैसे मिळेपर्यंत दरदिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ठेवीदारांनी स्पष्ट केले. दोन महिन्यांपूर्वी सावंतवाडीतील ठेवीदारांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्त्वाखाली सावंतवाडी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवरही गुन्हे दाखल झाले होते. त्यात काही ठेवीदारांना आपली रक्कमही मिळाली होती. त्यामुळे पॅनकार्डच्या विरोधात आता सर्वच जिल्हावासीय आक्रमक होताना आढळत आहेत. (प्रतिनिधी) ४00 ठेवीदार सहभागी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीस हजारांहून अधिक ठेवीदारांच्या सुमारे ४० कोटींच्या ठेवी आहेत. मात्र गेल्या दीड वर्षापासून कंपनीचे सर्व व्यवहार व परतावा रक्कम बंद झाल्याने ठेवीदारांसह मार्केटींग एजंट हवालदिल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यात ठेवीदारांनी तीव्र आंदोलन केले होते. ४0 कोटींहून अधिकची गुंतवणूक यावेळी अवधूत चव्हाण, राजा गावकर, नाना कुमठेकर, प्रमोद नाईक, मेघा गावकर, आशू परब, एम. एस. कडू, डी. के. चव्हाण. ए. एम. तळवडेकर यांनी ठिय्या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. गेली काही वर्षे पॅनकार्ड समूहाच्या माध्यमातून मार्केटींग एजंटद्वारे जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० टक्के ग्राहकांनी ४० कोटींहून अधिकची गुंतवणूक केली आहे. अनेक ठेवीदारांची ठेव मुदत तारीख उलटून गेली तरी ठेवीच्या रकमा गेल्या दीड वर्षापासून मिळत नाहीत. कोट्यवधी रकमेचा परतावा मिळत नसल्याने ग्राहकांचा संताप वाढत गेला. कंपनीतील वरिष्ठांशी संपर्क होत नसल्याने संतप्त ठेवीदारांनी आंदोलन छेडले आहे, असे सांगितले.