शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.ला 42 लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: March 15, 2017 20:14 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी व देवगड तालुक्यातील श्री कुणकेश्वर यात्रेच्या माध्यमातून

ऑनलाइन लोकमतसिंधुदुर्ग, दि. 15 - सिंधुदुर्ग जिल्ह्यात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी व देवगड तालुक्यातील श्री कुणकेश्वर यात्रेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग एस.टी. विभागाला 42 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आंगणेवाडी यात्रेतुन 23 लाख 94 हजार तर कुणकेश्वर यात्रेच्या माध्यमातून मिळालेल्या 18 लाख 38 हजार रुपयांच्या उत्पन्नाचा यात समावेश आहे.या यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणांहुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. प्रशासनाने चोख नियोजन केले होते. या दोन्ही यात्रेसाठी नियमित गाड्यांबरोबरच जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तसेच इतर सुविधाही देण्यात आल्या होत्या.आंगणेवाडी येथील श्री भराड़ी देवीच्या यात्रेसाठी सिंधुदुर्ग एस.टी. विभागाने 117 गाड्यांचा वापर करीत 1833 फेऱ्यांच्या माध्यमातून 1लाख 1 हजार प्रवाशांची वाहतूक केली. या सर्व गाड्यानी 53, 986 किलोमीटर अंतर प्रवास केला. यातून या विभागाला 23 लाख 94 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.या उत्पन्नात मालवण आगाराला 7 लाख 62 हजार, कणकवली आगाराला 6 लाख 29 हजार, देवगड आगाराला 1 लाख 93 हजार , कुडाळ आगाराला 6 लाख 56 हजार तर वेंगुर्ले आगारातून 39 हजार रुपयांच्या मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश आहे.कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी 90 गाड्यांच्या माध्यमातून 1646 फेऱ्यांमधुन प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या सर्व गाड्यांचा 57 हजार 715 किलोमीटर अंतर प्रवास झाला. यातून मालवण आगाराला 3 लाख 61 हजार, कणकवली आगाराला 6 लाख 97 हजार, देवगड आगाराला 5 लाख 94 हजार, विजयदुर्ग आगाराला 72 हजार, कुडाळ आगाराला 54 हजार , वेंगुर्ले आगाराला 60 हजार असे एकूण 18 लाख 38 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एस.टी. च्या चांगल्या नियोजनामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांची गैरसोय टळली.