सावंतवाडी : श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव येथे दरवर्षीप्रमाणे शारदोत्सव झाला. यानिमित्त पठण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रांगोळी स्पर्धेत लहान गटात प्रथम सुजाता साळगावकर व हर्षदा शिरोडकर, द्वितीय वैभवी मेस्त्री व हर्षदा सावंत, तृतीय क्रमांक सलोनी परब व तेजस्विनी जांंभळे यांनी पटकावला. गौरेश लांबर, राजाराम परब, प्रियांका सा वंत, गायत्री मेस्त्री यांना उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरविण्यात आले. मोठ्या गटात नम्रता साईल व वीणा आचार्य, द्वितीय मानसी सावंत व नमिता जाधव, तृतीय अपूर्वा केरकर व वैष्णवी कासार यांनी मिळविला. अक्षता व वैशाली पाटकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सावंतवाडी आरपीडी हायस्कूलचे कलाशिक्षक बी. व्ही. मालवणकर व एस. व्ही. कानसे यांनी केले. या शाळेतील गौरांगी सावंत या विद्यार्थिनीने आपल्या सुश्राव्य गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तबलासाथ विजय माधव व हार्मोनियमसाथ एच. बी. सावंत यांनी दिली. या कार्यक्रमानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वाळूच्या मत्स्याकृती रांगोळीला उपस्थितांची दाद मिळाली. या रांगोळीसाठी सिध्देश कानसे, प्राजक्ता गावडे, दिव्या सावंत यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक एच. बी. सावंत, संस्थासंचालक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)माजगाव येथील भाईसाहेब सावंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वाळूच्या मत्स्याकृती रांगोळीला उपस्थितांची दाद मिळाली.
माजगाव येथील स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: October 5, 2014 23:09 IST