शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कवितेमुळे आत्मिक समाधान

By admin | Updated: September 18, 2015 23:23 IST

मनोहर प्रभू : मालवण येथील भंडारी हायस्कूलमध्ये कार्यक्रम

मालवण : कविता ही स्वानंद देणारी असावी. कवितेमुळे माणसाला आत्मिक समाधान प्राप्त होते. काव्य हे शिकवायचे नसते, तर ते स्वत: अनुभवायचे असते. श्रावणगीते, पावसाची गाणी ही गायल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपण एका भावविश्वात न्हाऊन निघतो. भंडारी हायस्कूलने आयोजित केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक मनोहर प्रभू यांनी येथे बोलताना केले.मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मालवणचे साहित्यिक आणि भंडारी एज्युकेशन सोसायटीचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी रवींद्र वराडकर, मुख्याध्यापिका समिता मुणगेकर, पर्यवेक्षिका गौरी शिंदे, आदी उपस्थित होते.सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे सहायक शिक्षिका हेमश्री मांजरेकर यांनी स्वागत केले. यावेळी रवींद्र वराडकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका समिता मुणगेकर यांनी मराठी काव्याची महती सांगतानाच विद्यार्थ्यांनी निसर्गाकडे दुर्लक्ष करू नये, असे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात प्रशालेच्या दत्ताराम सारंग, लीना धुरी, स्नेहल मोंडकर, तन्वी पराडकर, साक्षी केळुसकर, लीशा कडू, अमृता वायंगणकर, श्वेता चव्हाण, मंथन बांदेकर, तन्वी आंबेरकर, करीना खराडे, स्नेहल पाटकर, निशिता चव्हाण, अमृता माळगे, विशाखा गावकर, गौरी मेस्त्री, साक्षी राऊळ, दिव्या चव्हाण, गायत्री पडते, मृण्मयी वर्देकर, सुकन्या देऊलकर, चिन्मय गवंडे, हेमा केरकर, गायत्री कोयंडे, पायल आढाव, शामल आंबेरकर, पल्लवी कोळगे, करुणा माडये, मिताली गोवेकर, सोहम कांबळी, प्रथमेश सामंत, दिव्या मालवणकर, प्रवरा कांबळी यांनी सहभाग घेत विविध श्रावणगीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजा सामंत हिने केले.निसर्गाचे मुलांशी असलेले नाते हरवतेय...यावेळी मनोहर प्रभू म्हणाले, पूर्वी पाठ्यपुस्तकामध्ये तालबद्ध कवितांचा समावेश असायचा. आज गद्यात्मक काव्य प्रकार सुरू झाला आहे. तालबद्ध काव्यामुळे मुलांना कविता समजतेच. शिवाय आत्मिक समाधानही प्राप्त होते. आजच्या काळातील गद्यात्मक कवितांमुळे हे सारे मागे पडले आह, असे असताना जुन्या नव्या पावसाळी गीतांवर आधारित प्रशालेने आयोजित केलेला हा कार्यक्रम एक स्तुत्य उपक्रम आहे, असे सांगून निसर्गाचे मुलांशी असलेले नाते आधुनिक तंत्रज्ञानाने हरवत चालले आह,े असेही ते म्हणाले.