शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन महोत्सवासाठी १0 लाख खर्च करावे

By admin | Updated: January 9, 2016 00:48 IST

बहुमताने ठराव संमत : वेंगुर्ले नगरपरिषदेच्या विशेष सभेत ९ जणांचे मतदान

वेंगुर्ले : पर्यटन महोत्सवासाठी नगरपरिषद फंडातून १0 लाख रुपये खर्च करावे की नको यावर एकमत न झाल्याने हा विषय मतदानासाठी टाकला. यात १0 लाख खर्च करावे यासाठी ९ जणांनी मतदान करीत बहुमताने हा ठराव संमत केला.वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे होणाऱ्या पर्यटन महोत्सवासाठी शुक्रवारी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन केले होते. यावेळी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, नगरसेवक रमण वायंगणकर, पद्मिनी सावंत, सुलोचना तांडेल, अन्नपूर्णा नार्वेकर, चेतना केळुसकर, अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर, निला भागवत, अवधूत वेंगुर्लेकर, वामन कांबळे, नम्रता कुबल, मनिष परब, अ‍ॅड. जी. जी. टांककर, प्रशांत नेरुरकर यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक हनिफ म्हाळुंगकर उपस्थित होते.१२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान मांडवी खाडीवर होणाऱ्या या पर्यटन महोत्सवात गायन स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, वेशभूषा, वाळू शिल्प प्रदर्शन, सौंदर्यवती स्पर्धा, चित्ररथ स्पर्धांबरोेबर अन्यही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. महोत्सवासाठी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्प तरतुदीनुसार वेंगुर्ले महोत्सवासाठी ५ लाख, गौरव व कर्तव्येसाठी २ लाख, सुरक्षेसाठी २ लाख व इतर १ लाख असा १0 लाखांचा निधी मिळणार आहे. मात्र, तरतूद निधीपेक्षा नगरपरिषदेचा जास्त निधी खर्च करु नये अशी सूचना रमण वायंगणकर यांनी केली. यावर अ‍ॅड. प्रभूखानोलकर यांनी नगरपरिषदेतर्फे दिला जाणारा १0 लाखांचा निधी योग्य असल्याचे सांगितले. मात्र, या विषयावर कोणतेच एकमत न झाल्याने हा विषय मतदानासाठी टाकला. यावेळी झालेल्या मतदानात १0 लाख रुपये निधीच्या बाजूने निला भागवत, सुषमा प्रभूखानोलकर, चेतना केळुसकर, अन्नपूर्णा नार्वेकर, मनिष परब, वामन कांबळे, अवधूत वेंगुर्लेकर, पद्मिनी सावंत व नगराध्यक्ष कुबल यांनी मतदान केले. रमण वायंगणकर व सुलोचना तांडेल यांनी विरुद्ध मतदान केले तर नम्रता कुबल व अभिषेक वेंगुर्लेकर हे मात्र या विषयाबाबत तटस्थ राहिले. त्यामुळे १0 लाख रुपये खर्चासाठी बहुमत मिळाल्याने हा ठराव संमत करण्यात आला.उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर यांनी वेंगुर्लेतील पर्यटन स्थळांची यादी करावी, अ‍ॅड. टांककर यांनी नगरपरिषदेच्या रेकॉर्डप्रमाणे शहरातील गल्ल्यांना नावे देऊन तसे फलक लावावेत असे सुचविले. पर्यटन महोत्सवाची माहिती देण्यासाठी सर्व नागरिकांची, हॉटेल व्यावसायिक, मच्छिमार, सांस्कृतिक मंडळे, शाळांचे मुख्याध्यापक, स्टॉलधारक यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष कुबल यांनी सांगितले.पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासाठी गठीत केलेल्या विविध कमिटीपैकी स्टॉल कमिटीवर अभिषेक वेंगुर्लेकर, अवधूत वेंगुर्लेकर, अन्नपूर्णा नार्वेकर, शोभायात्रा कमिटीवर निला भागवत, चेतना केळुसकर, फिलोमिना कार्डोज, स्पर्धा कमिटीवर अ‍ॅड. टांककर, प्रशांत नेरुरकर, मनिष परब, स्टेज कमिटीवर नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, वामन कांबळे, विविध परवानगी कमिटीवर मुख्याधिकारी रामदास कोकरे, अ‍ॅड. प्रभूखानोलकर व अ‍ॅड. टांककर तर निधी संकलन कमिटीवर प्रसन्ना कुबल, रमण वायंगणकर, सुलोचना तांडेल, नम्रता कुबल, अभि वेंगुर्लेकर यांनी निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)