शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विशेष सभा झाली दुसऱ्यांदा रद्द

By admin | Updated: May 7, 2016 00:41 IST

कणकवली नगरपंचायत : रस्त्यांसह विकास कामे रखडणार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

कणकवली : कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा गणपूर्ती अभावी शुक्रवारी पुन्हा एकदा रद्द झाली. त्यामुळे शहरातील रस्त्यांसह विविध विकास कामांच्या निविदांना मंजूरी मिळू शकली नाही. परिणामी आता शहरातील रस्त्यांची कामे रखडणार आहेत. कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा यापूर्वी २ मे रोजी होती. मात्र, या विशेष सभेला माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह काँग्रेसचे काही नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे ही विशेष सभा होऊ शकली नव्हती. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी एकमेकांवर परस्परविरोधी आरोप केले होते. त्यांच्यात हा कलगीतुरा रंगला असतानाच शुक्रवारी दुपारी ३ वाजता पुन्हा नगरपंचायतीची विशेष सभा होणार होती. यावेळी नगरपंचायत कार्यालयातील प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर, नगरसेवक सुशांत नाईक, राजश्री धुमाळे, नंदिनी धुमाळे, स्नेहा नाईक, सुमेधा अंधारी, प्रा. दिवाकर मुरकर उपस्थित होते. मात्र, सभेच्या नियोजित वेळेनंतर एक तास उलटून गेल्यानंतरही इतर नगरसेवक सभागृहात फिरकलेच नाहीत. (वार्ताहर)