शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पत्रादेवी महामार्गावर दुचाकी घसरून एक ठार

By admin | Updated: May 16, 2016 00:24 IST

मृत कागलचा : नानेलीतील एकजण गंभीर जखमी

सावंतवाडी : झाराप-पत्रादेवी महामार्गावरील मळगाव-पिंपळवाडी येथे दोघेजण जखमी अवस्थेत आढळून आले. त्यातील गणपत यशवंत मोरे (वय ४५, रा. करजीवणे, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांचा गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर सिद्धेश कमलाकर धुरी (२८, रा. नानेली, ता. कुडाळ) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी रात्री झाला असला, तरी पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव-पिंपळवाडी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास दोघेजण जखमी अवस्थेत पडले होते, तर या दोघांपासून काही अंतरावर दुचाकी पडली होती. त्यांना तातडीने तेथील ग्रामस्थांनी सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, या दोघांच्याही डोक्याला, तसेच हाताला, पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने गोवा-बांबुळी येथे हलविले. मात्र, यातील गंभीर जखमी गणपत यशवंत मोरे यांचे उपचार सुरू असताना रविवारी निधन झाले, तर सिद्धेश कमलाकर धुरी अद्याप गंभीर आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे दोघेजण जखमी अवस्थेत आढळून आले. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती कोणालाही माहीत नाही. तसेच शनिवारी रात्री दोघेजण जखमी अवस्थेत मिळाल्यानंतर या अपघाताची नोंद रविवारी सकाळी ११ वाजता झाली आहे. याबाबतची माहिती प्रसाद सावंत यांनी पोलिसांना दिली आहे. यातील मृत गणपत मोरे यांचे नातेवाईक रविवारी सकाळी गोवा-बांबुळी येथे पोहोचले असून, पोलिसांनी अपघाताबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली होती. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बापू गवारी करीत आहेत. (प्रतिनिधी)