शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोहिरोबांचे साहित्य आत्मानुभवातून साकारलेले

By admin | Updated: March 24, 2015 00:17 IST

गोविंदराव काळे : बांदा येथे संत सोहिरोबानाथ जन्मत्रिशताब्दी समारोप सोहळा

बांदा : संत तुकोबांची निस्पृहता, संत एकनाथांची निर्वेरता व संत ज्ञानोबा माऊलींचा अमृतानुभव या तिन्हींचा संगम संत सोहिरोबानाथांमध्ये पाहण्यास मिळतो. आपल्याला कितीही ज्ञान मिळाले तरी हरी म्हणजे परमात्म्याविना ते व्यर्थ आहे. याच हरीच्या भजनावीणा काळ घालवू नको रे, असा संदेश नाथांनी दिला आहे. अनुभव म्हणजे प्रचिती आल्याशिवाय मान डोलावू नको, असा उपदेश करणाऱ्या संत सोहिरोबानाथांचे साहित्य हे प्रत्यक्ष आत्म अनुभवातून साकारलेले लेखन आहे, असे प्रतिपादन पर्वरी- गोवा येथील व्याख्याते गोविंदराव काळे यांनी बांदा येथे केले.संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या जन्मत्रिशताब्दी समारोप सोहळ्यानिमित्त बांदा येथे २१ ते २८ मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात रविवारी आयोजित केलेल्या आध्यात्मिक व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, आज विज्ञान तसेच इंग्रजी शिक्षण हे आवश्यक व उपयुक्त असले तरीही संस्कार, सद्विवेक आणि संतांचे उपदेश हे कधीच विसरता कामा नये. परमार्थ आपल्याला जीवन जगण्यास शिकवितो. जीवनाच्या कल्याणासाठी संतांना शरण जाणे आवश्यक आहे. संत परंपरा भोगाचा नव्हे, तर मुक्तीचा मार्ग दाखविते. संत एखाद्या नावाड्याप्रमाणे स्वत: भवसागरात तरतात व इतरांनांही तारतात.या समारोप सोहळ्याचे उद्घाटन काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. याप्रसंगी उपसरपंच बाळा आकेरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर, संत सोहिरोबानाथ जन्मत्रिशताब्दी समितीचे अध्यक्ष सावळाराम सावंत, उपाध्यक्ष गिरीष महाजन, सचिव प्रकाश मिशाळ, अ‍ॅड. रामनाथ आंबिये, प्रसाद आंबिये, विवेक आंबिये, दिवाकर नाटेकर, गुरुनाथ सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. आर. सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन आशुतोष भांगले यांनी करून आभार मानले. या व्याख्यानासाठी संतप्रेमी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)