शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणचा कर्मचारी पवार अखेर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 17:35 IST

सिंधुदुर्गनगरी : दिव्यांग व्यक्तिकडून अडिच हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेले जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ ...

ठळक मुद्देलाच घेणे आले अंगलटमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूलक्ष्मी यांनी दिले आदेश

सिंधुदुर्गनगरी : दिव्यांग व्यक्तिकडून अडिच हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेले जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यक विद्याधर पवार यांना गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे.जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक विद्याधर राजाराम पवार (वय 52) यांना अडिज हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी जिल्हा परिषद आवारात दुपारी दीड वाजता रंगेहाथ पकडले होते. एका दिव्यांग व्यक्तिकडून रोख लाच घेताना ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता 6 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.शासनाच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना कार्यान्वीत आहेत. यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनता यावे. स्वरोजगारातून स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्टया उभे राहता यावे, यासाठी आर्थिक मदत करणारी योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने राबविली जाते.

याच योजनेचा लाभ मिळावा यासाठी एका दिव्यांग व्यक्तीने स्वयंरोजगारसाठी 25 हजार रुपयांचे बीज भांडवल मिळावे, यासाठी अर्ज समाज कल्याण विभागाकडे केला होता. मात्र, हे प्रकरण मंजूर करण्यासाठी विद्याधर पवार यांनी अडिज हजार रुपयांची लाच मागितली होती. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने सबंधित दिव्यांग व्यक्ती अडचणीत आली होती. त्यामुळे त्यांनी याची तक्रार 2 डिसेंबर रोजी कुडाळ येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती.

लाचलुचपत विभागाने याचे गांभीर्य ओळखत तात्काळ कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार सापळा रचत मंगळवारी दुपारी दीड वाजता जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर असलेल्या टपाल मध्यवर्ती कार्यालयाकडे ही रक्कम वरिष्ठ सहाय्यक पवार हे स्वीकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बुधवारी पवार यांना येथील जिल्हा विशेष न्यायालयात हजर केले असता 6 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी विद्याधर पवार यांच्यावर कोणती कारवाई करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर मंजूलक्ष्मी यांनी गुरुवारी पवार यांच्यावर निलंबनची कारवाई केली आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणsindhudurgसिंधुदुर्ग