शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाश्रयमध्ये जोपासली सामाजिक बांधीलकी

By admin | Updated: May 23, 2016 00:25 IST

नव्या कपड्यांचे वितरण : बबनकाका परब यांना जयप्रकाश गोसावी ट्रस्टचा ‘सिंधुरत्न पुरस्कार’

चौके : जयप्रकाश गोसावी सेवा संस्था बोर्डवेचे अध्यक्ष जयप्रकाश गोसावी आणि त्यांच्या पत्नी नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवेच्या अध्यक्षा तसेच आश्रमशाळा बोर्डवेच्या संचालिका उर्मिला जयप्रकाश गोसावी यांनी आपल्या लग्नाचा २७ वा वाढदिवस अणाव दाभाचीवाडी येथील बबनकाका परब यांच्या जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रयमधील निराधार वृद्धांसोबत साजरा करून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न केला.आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गोसावी पती-पत्नीनी सर्व निराधार वृद्धांना दुपारचे भोजन आणि सर्वांना नवीन कपड्यांचे वाटप केले. तत्पूर्वी, जयप्रकाश गोसावी सेवा संस्था बोर्डवेच्यावतीने आनंदाश्रयचे संस्थापक बबनकाका परब यांचा ‘सिंधुरत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जयप्रकाश गोसावी, उर्मिला गोसावी, बोर्डवेचे उपसरपंच शामसुंदर मोडक, माजी सरपंच गजानन शिंदे, दिलीप तावडे, प्रदीप पालव, शंकर घाडी, विजय गोसावी, नंदकुमार गोसावी, प्रकाश सावंत, सुंदर साळवी, आनंदाश्रयचे विश्वस्त आप्पा भिसे आदी उपस्थित होते.निराधार वृद्धांसमोर आश्रमशाळेतील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्यांचेमनोरंजन केले व त्यांना नातवंडांच्या सहवासाची अनुभूती घडविली. यावेळी मार्गदर्शन करताना आनंदाश्रयचे संस्थापक बबनकाका परब यांनी सांगितले की, जयप्रकाश गोसावी आणि उर्मिला गोसावी यांनी आपला आनंद निराधारांसोबत वाटून घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद. हा वृद्धाश्रम नसून सेवाश्रम आहे. आम्ही फक्त मुले नसलेल्या निराधारांनाच याठिकाणी दाखल करून घेतो. वृद्धाश्रम ही कौतुकाची बाब नाही. आता समाजाला या समस्येची जाणीव होतेय आणि ही जाणीवच ही समस्या कमी करेल. सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ज्येष्ठांची परवड झाली आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे. तुमच्यासारख्या अनेकांमार्फत देवाने हे माझ्याकडून घडवून आणले आहे.यावेळी उर्मिला गोसावी यांनी सांगितले की, समाजातील ही समस्या दूर करण्यासाठी समाजातील तरुण मंडळींना जागृत करण्याचे काम आम्ही करू. प्रत्येक पालकांच्या मुलांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्यास वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही. (वार्ताहर)