शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

फराळाला फोडणी महागाईची

By admin | Updated: November 10, 2015 23:35 IST

महागाईचा फटका : साखर, तेलाचे दर स्थिर; गृहिणींचे बजेट कोलमडले

रत्नागिरी : ऐन दीपावलीच्या दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वधारल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसला आहे. साखर, तेलाचे दर मात्र स्थिर राहिले असले तरी अन्य वस्तूंच्या दरात झालेल्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.गणेशोत्सवानंतर महिनाभरात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. १५० ते १८० रूपये किलो दराने तूरडाळ विकली जात आहे. मूगडाळ १२० ते १३०, तर मसूरडाळ ९० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. मूग ९२ ते ९६ रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. चणा ६०, काबुली चणा ६५ ते ७०, चवळी ६० ते ७०, उडीद डाळ १४०, मटकी १०६, मसूर ८८, पोहे २५ ते २८, रवा ३० ते ३२ रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. खोबरे २०० ते २५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. १०६ ते ११० रुपये दराने शेंगदाण्याची विक्री सुरू आहे. बेसन ७८ रूपये, आटा २५ ते २८, गूळ ४० ते ४२, साखर २८ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.कांदा ३० ते ४०, बटाटा १६ ते २०, लसूण १०० ते १२० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. दीपावलीच्या सणाचा आनंद सर्वसामान्यांना घेता यावा, असे अपेक्षित असताना दरवाढीमुळे आनंदावर विरजन पडत आहे. नोकरदार महिलांना सुट्या मिळत नसल्यामुळे तयार फराळास विशेष मागणी असते. दरवाढीमुळे रेडीमेड फराळाच्या किमतीतही दर वाढ झाली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या असल्या तरी सर्वसामान्य ग्राहक खरेदीसाठी बजेट पाहून हात आखडता घेत आहेत. महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी तुरळक प्रमाणात गर्दी होती. काही ठराविक दुकानांसमोर ग्राहकांनी गर्दी केली होती. बाजारात मंदी आल्याचे दिसत होते. सुटीच्या दिवशीही ग्राहकांचा थंड प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)फराळाला कमी प्रतिसादऐन दिवाळीच्या काळात महागाईच्या भडक्याचा त्रास गृहिणींना सहन करावा लागला. महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. त्यामुळे यावर्षी बाजारात खरेदीसाठी तुरळक गर्दी केली होती. फराळासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे दर वाढल्याने गृहिणींनी हात आखडता घेतला आहे. तसेच तयार फराळालादेखील कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मात्र, बचत गटांनी तयार केलेल्या फराळाला यावेळी अधिक पसंती होती.