शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

होडावडात ‘खवल्या’ची तस्करी

By admin | Updated: January 18, 2017 00:02 IST

होमगार्ड ताब्यात : वनविभागाकडून आणखी पाचजणांची नावे निष्पन्न

कुडाळ : तस्करीच्या उद्देशाने होडावडा (ता. वेंगुर्ले) येथील घरात बंदिस्त ठेवण्यात आलेले खवले मांजर उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी धाड टाकून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली असून, पोलिसांनी होमगार्डच्या सेवेत असलेल्या परशुराम गोविंद पार्सेकर याला ताब्यात घेतले आहे. या खवले मांजराची किंमत बाजारभावाने एक लाख रुपये आहे. पोलिसांनी कारवाईनंतर खवले मांजरासह आरोपी वनविभागाच्या ताब्यात दिला आहे. वनविभागाच्या चौकशीत या प्रकरणात आणखी पाचजणांची नावे निष्पन्न झाली आहेत.कुडाळ वनक्षेत्रपाल पी. जी. कोकितकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, १६ जानेवारी रोजी रात्री सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलिसांनी वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा येथे जाऊन परशुराम पार्सेकर यांच्या घराची तपासणी केली असता घरात बंदिस्त अवस्थेत खवले मांजर आढळून आले. पार्सेकर यांची चौकशी करून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व खवले मांजरासह आरोपीला सावंतवाडी उपविभागीय कार्यालयात आणण्यात आले. तेथे याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने रात्री उशिरा खवले मांजरासह आरोपीला ताब्यात घेतले.त्यानंतर मंगळवारी दिवसभर संशयित आरोपी परशुराम पार्सेकर याची वनविभागाने कसून चौकशी केली. यात आरोपीने १३ जानेवारी रोजी आपल्याच काजूच्या बागेत त्या खवले मांजराला पकडल्याची माहिती दिली. बरेच दिवस या बागेत हे मांजर येत होते, असे त्याने सांगितले. त्यानंतर पाळत ठेवून संतोष पेडणेकर व रॉली डिसोजा यांच्या सहकार्याने हे मांजर पकडण्यात आले. त्यानंतर गेले चार दिवस ते मी पिंजऱ्यात बंदिस्त ठेवून ग्राहकांचा शोध घेत होतो, असे त्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.आरोपी पार्सेकर याने वनविभागाला दिलेल्या माहितीनंतर वनविभागाच्या पथकाने खवले मांजराची विक्री करण्यासाठी तसेच त्याला पकडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पाचजणांना ताब्यात घेतले. यात संतोष पेडणेकर (रा. होडावडा सुभाषवाडी), रॉली फ्रॅन्सिस डिसोजा (रा. होडावडा सुभाषवाडी), बाबू तांबोसकर (रा. होडावडा), जयप्रकाश तिरोडकर (रा. मळेवाड), गावडे (पूर्ण नाव समजू शकले नाही, मळेवाड) यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी विविध कलमांखाली परशुराम पार्सेकर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी परशुराम पार्सेकर हा गृहरक्षक दलामध्ये कार्यरत असल्याचे तपासात पुढे आले असून, इतर आरोपींची वनविभाग माहिती घेत आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल एल. एम. पडकील, जी. आर. दुधवडकर, डी. बी. वसावे, ए. एस. सावंत, पी. एस. चव्हाण यांनी केली आहे. वनविभागाच्यावतीने वनपाल रामचंद्र मडवळ, विनोद मयेकर, वनरक्षक विष्णू नरळे, सूर्यकांत सावंत, सायली कांबळे, सदानंद परब हे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)खरेदीसाठी मुंबईची पार्टीसंशयिताने १३ जानेवारी रोजी हे मांजर पकडले होते. या मांजराच्या खरेदीसाठी मुंबईहून पार्टी येणार असल्याची माहितीही वन विभागाला मिळाली आहे. शिवाय हे रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी करणारे असल्याची शक्यता आहे. या खवल्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये किंमत होत असल्याने संशयिताला या मांजर तस्करीतून किमान एक लाख रुपये मिळण्याची शक्यता होती.यापूर्वी वाडोस येथे कारवाईयापूर्वी वाडोस येथेही खवले मांजराच्या खवल्यांची विक्री केल्याप्रकरणी संशयितांवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १७५ खवले जप्त करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जिवंत खवले मांजरच सापडल्याने येथे रॅकेट कार्यरत असल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यानुसार या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आवाहन वनविभागासह पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.