शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बंधारा फुटून देवबागमध्ये समुद्राचे पाणी घुसले

By admin | Updated: June 19, 2015 23:42 IST

अजस्त्र लाटांचा तडाखा : घाटात दरडी कोसळून वाहतूक विस्कळीत

सिंधुदुर्गनगरी : मालवण किनारपट्टीवर अजस्त्र लाटांनी शुक्रवारी देवबाग येथील बंधारा उद्ध्वस्त करत गावात प्रवेश केला. यामुळे मालवण किनारपट्टीच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यांचा फटका वाडा, तांबळडेग व जामसंडे गावांना बसला असून, नुकसानीच्या घटना घडल्या. करूळ आणि भुईबावडा घाटात दरडींची पडझड सुरूच आहे. त्यामुळे दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती. मालवण तालुक्यातील देवबाग, तोंडवळी, तळाशील या किनारपट्टीवरील गावांना अजस्त्र लाटांनी तडाखा दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवबाग ख्रिश्चनवाडी येथे दुपारी लाटांनी बंधारा पार करून गावात प्रवेश केला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लाटांनी जमीन पोटात घेतल्याने बंधारा खिळखिळा झाला. मसुरे, आचरा, डांगमोडे, कालावल, खोतजुवा, काळसे या खाडीपट्ट्यातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. देवबाग, तोंडवळी, तळाशील या सागरी अतिक्रमणग्रस्त गावांना समुद्राच्या लाटांनी दणका दिला. गेली २० वर्षे मागणी करूनही देवबाग-मोबारवाडी येथे २०० मीटरचा बंधारा न घातल्याने समुद्राच्या लाटा या भागात घुसल्या. मालवण तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यासह दूरध्वनी सेवाही ठप्प झाली होती. मालवण पोलीस वसाहतीनजीकही लाटांचे पाणी घुसले. बंदर विभागाने तीन क्रमांकाचा बावटा फडकावून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. गगनबावडा मार्ग ठप्पवादळी पावसामुळे सकाळी वैभववाडी ऐनारी फाट्यानजीक झाड उन्मळून पडले. त्यामुळे तीन तास खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प होती. स्थानिक शेतकऱ्यांनी कोसळलेले झाड हटवून सकाळी ११ नंतर मार्ग खुला केला. दरम्यानच्या काळात या मार्गावरील वाहतूक वैभववाडीमार्गे वळविण्यात आली होती. देवगड किनारपट्टीला तडाखादेवगड तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका वाडा, तांबळडेग व जामसंडे गावांना बसला असून, काही घरांची किरकोळ स्वरूपाची पडझड झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, समुद्रामध्ये उधाण परिस्थिती निर्माण होऊन समुद्राच्या महाकाय लाटा तांबळडेग किनारी धडकत आहेत. यामुळे पाऊस व वादळी वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)