शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वर्षभरात विनापरवाना १० हजार झाडांची कत्तल

By admin | Updated: January 8, 2016 01:02 IST

वनविभाग : प्राण्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्नही ऐरणीवर

रत्नागिरी : जिल्ह्यात राजरोसपणे अवैधरित्या जंगलतोड सुरू असून, वर्षभरात विनापरवाना ९७०३ झाडे तोडल्याची नोंद वन विभागाकडे आहे. जंगलतोड करणाऱ्यांकडून वर्षभराच्या कालावधीत सुमारे ४ लाख १४ हजार ६५० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात बेसुमार लाकूडतोड होत असल्याने डोंगर ओसाड होत आहेत. त्याचा गंभीर परिणाम वातावरणावर होत असल्याचे दिसून येत आहे. जंगलतोड होत असल्याने जंगली प्राणी लोकवस्तीकडे येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्याच्या शोधात बिबटे व अन्य प्राणी लोकवस्तीत शिरत असल्याने त्यांच्या अस्तित्त्वाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात चालू असलेल्या अवैधरित्या वृक्षतोडीकडे वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे एकूणच स्थितीवरून दिसून येत आहे. वनविभागाच्या आशीर्वादानेच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी स्वत: वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन जंगल भागाचा दौरा करण्याचा निर्णयही घेतला होता. अवैधरित्या सुरु असलेली जंगलतोड रोखण्यासाठी वनविभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी फिरती करण्यात येत असली तरी जंगलतोडीचे प्रमाण कमी झालेले नाही. विभागीय वन अधिकाऱ्यांकडून विनापरवाना वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस फिरते पथकही ठेवण्यात आले आहे. वर्षभराच्या कालावधीत जानेवारी २०१५पासून चिपळूण वन विभागाने विनापरवाना वृक्षतोडप्रकरणी दंडात्मक कारवाई करून ४ लाख १४ हजार इतका दंड वसूल केला आहे.वर्षभराच्या कालावधीत ९७०३ झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आली. त्यामध्ये चिपळुणात ३८६१, गुहागर ९५, दापोली ५२५, खेड ६४६, मंडणगड २०१, राजापूर १६२८, लांजा १५५६, संगमेश्वर ५७० आणि रत्नागिरीतील ६२१ झाडांचा समावेश आहे. ही विनापरवाना वृक्षतोड वन विभागाने कागदोपत्री नोंद केली असली तरी प्रत्यक्ष बेसुमार वृक्षतोड होत असल्याचे जिल्ह्यात चित्र दिसून येत आहे. विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या २८१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)वृक्षतोड अधिनियम : तालुकावार कारवाईअवैध जंगलतोड करताना आढळून आलेल्यांवर महाराष्ट्र वृक्षतोड (विनियमन) अधिनियम १९६४ सुधारणा १९८९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या अधिनियमाप्रमाणे सन २०१५ या वर्षभरात २८१ विनापरवाना वृक्षतोड प्रकरणे आहेत. तालुकावसूल दंड चिपळूण९१५००गुहागर ६२५०दापोली५५८००खेड५५२००मंडणगड१२३००राजापूर५६०५०लांजा६१२००संगमेश्वर४२९५०रत्नागिरी३३४००एकूण४१४६५०तालुकाप्रकरणेचिपळूण३९गुहागर३दापोली२९खेड१४मंडणगड९३राजापूर३०लांजा३१संगमेश्वर२२रत्नागिरी२०निसर्गप्रेमींची खंतरत्नागिरी जिल्ह्यात वृक्षाखालील क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याने निसर्गप्रेमींकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे.