शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

आराखडा रद्द करण्याचा एकमुखी ठराव

By admin | Updated: September 22, 2015 23:55 IST

मालवण नगरपरिषदेची विशेष सभा : मुख्याधिकारी, आवेशक अनुपस्थित, सभेला नागरिकांचीही उपस्थिती

मालवण : मालवण शहर विकास आराखड्यावरून संपूर्ण मालवण शहर ढवळून निघाले असताना नगरपरिषदेची विशेष सभा बोलावून नगरसेवकांनी आराखड्याबाबत आक्रमक विरोधी भूमिका मांडली. आराखड्याचे पाप हे प्रशासन व नगरविकास खात्याचे आहे. काही झारीतील शुक्राचार्य याचे राजकारण करून मालवण शहरावरच अन्याय करताना नगरसेवकांना लक्ष्य करीत आहेत. मात्र या आराखड्याबाबत नगरसेवकांचा कोणताही हस्तक्षेप नाही. आमचीही घरे, जमिनी आराखड्यामुळे बाधित होऊन आम्हीही विस्थापित होण्याच्या मार्गावर आहोत, असे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अन्यायकारक आराखडा रद्द व्हावा, असा एकमुखी ठराव घेतला. दरम्यान, हा ठराव तत्काळ नगररचना विभागाकडे सादर करण्याचे आदेश नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी पालिका प्रशासनाला दिले. मालवण शहर विकास आराखड्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नगरसेवकांच्या मागणीनुसार बोलाविण्यात आलेली विशेष सभा मंगळवारी पालिका सभागृहात नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नागरिकांचा या आराखड्यास वाढता विरोध व हरकती होत्या. या पार्श्वभूमीवर आराखड्याबाबत नगरसेवक काय भूमिका घेतात याची उत्सुकता असल्याने सभेला हजर राहण्यासाठी नागरिकही दाखल झाले. मात्र सभागृहातील गॅलरीत मोठ्या प्रमाणात प्रशासनाची कागदपत्रे व अन्य साहित्य ठेवण्यात आल्याने दरवाजा उघडणे मुश्किल होते. त्यामुळे आलेल्या नागरिकांच्या मागणीनुसार नगराध्यक्ष तोडणकर यांनी नागरिकांना सभागृहातच बसण्याची परवानगी देताना कामकाजात कोणताही हस्तक्षेप न करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी पार पडलेल्या विशेष सभेत गटनेते सेना नगरसेवक रविकिरण आपटे तसेच मुख्याधिकारी अरविंद माळी व आवेक्षक सुधाकर पाटकर हे अनुपस्थित होते. शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या सभेला मुख्याधिकारी व आवेक्षक गैरहजर राहतात, याबाबत सुदेश आचरेकर व नितीन वाळके यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)‘त्या’ बैठकीचे इतिवृत्त मिळणार कधी?यावेळी पूजा करलकर यांनी २३ जुलै रोजी नगररचनाकारासोबत जी बैठक झाली त्या सभेचे इतिवृत्त मागणी करूनही मिळत नाही. ते मिळाल्यास झारीतील शुक्राचार्य कोण हे अधिक स्पष्ट होईल. तसेच काही आरक्षणे न उठल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली तर सभागृहातील गॅलरी नागरिकांसाठी खुली व्हावी या मागणीचे काय झाले असा प्रश्न करलकर यांनी विचारला. महेंद्र म्हाडगुत यांनी ही बैठक यापूर्वी व्हायला हवी होती. आता हरकत व विरोध दर्शवून आराखडा रद्द होणार असेल याला आपलाही विरोध आहे असे त्यांनी सांगितले. तर महेश जावकर यांनी आराखड्यास आपला विरोधच असल्याचे स्पष्ट केले. शीला गिरकर व जॉन नरोना यांनी नागरिक विस्थापित होणार आहेत असे रस्ते रद्द करावेत असे सांगितले. सेजल परब यांनी दांडी प्रभागात काहींची घरे तोडून रस्ते जाणार आहेत. सर्वांसाठीच हा अन्यायकारक आराखडा आहे. याबाबत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी आराखड्याविरोधी भूमिका मांडली आहे. हा आराखडा रद्द व्हावा, अशी शिवसेना व नगरसेवकांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वानमते आराखडा रद्द व्हावा असा ठराव घेण्यात आला. नगररचनाकारांची घिसाडघाईविकासाची संकल्पना राबविताना सर्वाधिक वस्ती व दुकाने असलेली बाजारपेठ रुंद होऊन नागरिक, दुकानदार विस्थापित होऊ नये म्हणून आम्ही हा रस्ता १९८१ च्या विकास आराखड्याप्रमाणे ९ मीटरचा ठेवला व अन्य प्रमुख रस्ते ९ मीटर ठेवण्याची भूमिका मांडली. मात्र मालवण शहर विस्थापित करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील एका झारीतील शुक्राचार्य याने हा अन्याय केला आहे. हा आराखडा रद्द करून आम्ही नागरिकांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. नगररचनाकारांना हाताशी धरून घिसाडघाईने घेतलेला निर्णय शासनाचा म्हणजे भाजपाचा आहे.- सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष, मालवणपालकमंत्री गप्प का?तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी कुडाळचा अन्यायकारक आराखडा नागरिकांच्या विरोधानंतर रद्द केला तशी कोणतीही भूमिका विद्यमान पालकमंत्री घेत नाही. आमदार, खासदारही गप्प आहेत. आम्हाला नाहक दोषी ठरविणाऱ्या मंडळींनी चर्चला यावे, राजकारण करू नये. गरीब जनता आपली घरदारे जाणार म्हणून झोप विसरले आहेत. या सर्व मालवणवासीयांच्या मागे नगरसेवक म्हणून खंबीर उभे राहू. आराखडा रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही आराखडा रद्द करण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालू, असे आश्वासित केले आहे.- मंदार केणी, नगरसेवक, मालवणनगररचनाकारांचे अगाध ज्ञान८४ पानाचा प्रारूप विकास आराखडा इंग्रजीत आहे. केवळ यात दाखविण्यात आलेले संदर्भ झोप उडवणारे व इतिहास बदलणारे आहेत. मालवणचा नगराध्यक्ष जनतेतून निवडला जातो. मालवण बंदरातून जगभरात माल निर्यात होतो?. अक्रोडचे पीकही मालवणात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शासकीय मत्स्य प्रक्रिया उद्योग मालवणात असून प्रत्यक्ष ५०० लोक सहभागी आहेत. असे अकलेचे तारे तोडताना किल्ले सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाच नाही. तर केवळ तटबंदीच बांधली अशा अगाध ज्ञानाचे संदर्भ नगररचनाकारांनी माहिती पुस्तिकेत मांडले आहेत.- नितीन वाळके, नगरसेवक, मालवण