शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सिंधुदुर्ग राज्यात अव्वल बनविणार

By admin | Updated: August 21, 2016 22:50 IST

रवींद्र चव्हाण : शहरातील प्रभाग चार कार्यालयाचे उद्घाटन; भाजप टीमचे केले विशेष कौतुक

मालवण : पालिकांचे बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मालवण शहरातील प्रभाग चार येथे भाजपच्या प्रभाग कार्यालयाचे उद्घाटन बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पालिका निवडणुकीच्या विजयाचे हे कार्यालय पहिले पाऊल आहे. शहरातील विकासासाठी शतप्रतिशत भाजप होणे आवश्यक आहे. राज्याला भाजपच्या रूपाने गतिमान सरकार लाभल्याने मालवणसह सिंधुदुर्ग राज्यात एक नंबरचा जिल्हा बनविणार, अशी ग्वाही चव्हाण यांनी उद्घाटनप्रसंगी दिली. दरम्यान, प्रभाग चारचे अध्यक्ष गणेश कुशे तसेच तालुक्यातील भाजपच्या टीमचे चव्हाण यांनी कौतुक करताना पालिकेवर भाजपाचा झेंडा निश्चितच फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजपच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली जात आहे. मालवण येथील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून अपेक्षित विकास भाजपच्या माध्यमातून साकारला जाईल, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, विलास हडकर, महेश मांजरेकर, भाऊ सामंत, आप्पा लुडबे, गोपी पालव, जयदेव कदम, आबा कोंडुसकर, विजू केनवडेकर, विनोद भोगावकर, पूर्वा ठाकूर, पूजा सरकारे, गजानन ठाकूर, बबन परुळेकर तसेच विलास सामंत, दादा कांदळकर, महेश जावकर, भाई कासवकर, आदी तसेच मेढा भागातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी) एक हजार नागरिकांना विमा सुरक्षा भाजप प्रभाग चारच्यावतीने शहरातील एक हजार नागरिकांना दोन लाख रुपये किमतीचा मोफत अपघाती विमा सुरक्षा देण्यात आला आहे. याबाबतही मंत्री चव्हाण यांनी गणेश कुशे यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते विमा सुरक्षा पत्र वितरीत करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती देताना त्याचे थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत, अशी माहिती प्रभाग अध्यक्ष गणेश कुशे यांनी दिली. यावेळी कुशे यांच्या हस्ते मंत्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.