शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

पॉवरलिफ्टिंगमध्ये सिंधुदुर्ग संघाचे यश

By admin | Updated: March 12, 2015 23:54 IST

झारखंडमध्ये स्पर्धा : पाच सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्यपदकाची कमाई

वेंगुर्ले : झारखंड पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आयोजित राष्ट्रीय युवक क्रीडा विभाग भारत सरकार व इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशन मान्यतेच्या राष्ट्रीय बेंचप्रेस पुरुष, महिला पॉवरलिफ्टिंग इक्वीए, अनइक्वीए चॅम्पियनशिप आणि एशियन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०१५ हाँगकाँग निवड चाचणी स्पर्धेत पॉवरलिफ्टिंग संघाने पाच सुवर्ण, तसेच एक रौप्य व कांस्यपदक जिंकले. जे. आर. डी. टाटा स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, जमशेदपूर येथे मंगळवारी झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे राज्य अध्यक्ष गुरुवर्य मधुकर दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या सिंधुदुर्गच्या ६० जणांच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी केली. यामध्ये सब ज्युनियर गटातील ८४ किलो वजनी गटात डायना जॉन डिसोजा हिने इक्वीए व अनइक्वीएमध्ये दोन सुवर्ण पदके प्राप्त करीत सुवर्णकन्या होण्याचा ुमान मिळविला, तर ७२ किलो वजनी गटात नमिता गावडे हिने रौप्यपदकाची मानकरी ठरली. राष्ट्रीय खेळाडू अनुजा तेंडोलकर हिने महिला मास्टर गटात ८४ किलोवरील वजनी गटात दबदबा कायम राखत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. वेंगुर्ले-खानोली येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलीप नार्वेकर यांनी ९३ किलो वजनीगटात मास्टर दोन गटातून एक सुवर्ण व एक कांस्यपदक मिळवून सिंधुदुर्ग संघाला राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविले. देशभरातून २७ राज्यांतील सहाशे स्पर्धक या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. यशस्वी स्पर्धकांचे सिंधुदुर्ग पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष पुष्कराज कोले, इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनचे सुब्रतो दत्ता, मधुकर दरेकर, सिंधुदुर्ग विद्यानिकेतन अध्यक्षा अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर, नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, नगरसेवक मनीष परब, रमण वायंगणकर, रोटरी सचिव राजन गिरप, सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे आनंद परूळेकर, प्रशांत नेरूरकर, प्राचार्य स्वरा तळेकर, बॅ. खर्डेकर कॉलेजचे प्रा. डॉ. विलास देऊलकर, राजेश घाटवळ, प्रशिक्षक अमोल तांडेल, किशोर सोन्सूरकर यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)महिला गटाला ‘जनरल चॅम्पियन’ सिंधुदुर्ग संघाने उत्कृष्ट कामगिरी केल्याने महाराष्ट्राला महिला गटासाठी ‘जनरल चॅम्पियन’ हे प्रथम क्रमांकाचे पदक प्राप्त झाले. मुंबईच्या पोलीस उपनिरीक्षक कल्पना सावंत यांनी बेंचप्रेसमध्ये तीन सुवर्ण व एक रौप्यपदक प्राप्त करत ‘स्ट्राँग वुमन’ हा किताब मिळविला. या स्पर्धेतून हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघ निवडला जाणार आहे.