शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्चात सिंधुदुर्ग कोकणात आघाडीवर

By admin | Updated: January 16, 2016 23:50 IST

: भंडारी

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यातील मंजूर १२५ कोटी निधीपैकी ५० कोटी निधी प्रत्यक्ष विविध विकासकामांवर खर्च करण्यात आला असून, उर्वरित निधी ३१ मार्चपूर्वी खर्च होईल. जिल्हा नियोजनचा निधी खर्च करण्यात सद्य:स्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात आघाडीवर असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनचा आराखडा १२५ कोटी रुपये एवढा मंजूर केला होता. यात जिल्हा महसूल प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनातील विविध विभागांना हा निधी वितरित करण्यात येतो. हा निधी मार्च २०१६ पूर्वी १०० टक्के खर्च होणे बंधनकारक आहे. जिल्हा नियोजनच्या आर्थिक बजेटच्या बैठकीत निधी चर्चेअंती मंजूर केला जातो. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार गतवर्षी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजनचा वार्षिक आराखडा १२५ कोटी रुपये मंजूर करून आणला होता. याबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, मागील दहा महिन्यांच्या कालावधीत विविध विकासकामांवर ४० टक्के निधी म्हणजेच ५० कोटी निधी खर्च झाला आहे. उर्वरित ७५ कोटी निधी मार्चअखेर खर्च होणार आहे. निधी खर्चाबाबत सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकण विभागात आघाडीवर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीची सभा २१ जानेवारीला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. या सभेत २०१६-१७ चा वार्षिक नियोजन आराखडा सादर केला जाणार आहे. सभागृहात सविस्तर चर्चा केल्यानंतर या बजेटला मान्यता घेण्यात येणार असल्याचेही अनिल भंडारी यांनी स्पष्ट केले.