शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गला पावसाने झोडपले

By admin | Updated: July 14, 2017 22:54 IST

सिंधुदुर्गला पावसाने झोडपले

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी येथील संगीता प्रभाकर माळकर (वय ४०) ही महिला ओढ्याच्या पाण्यात वाहून गेली. सकाळी ओढ्यावर कपडे धुण्यासाठी ती गेली होती. तिचा शोध सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथे रेल्वे टॅ्रकवर माती कोसळल्याने वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती. बिकानेर-कोइमतूर रेल्वे कणकवली रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस पाऊस अधूनमधून पडत होता. तर काही ठिकाणी पाऊस आवश्यक त्या प्रमाणात पडत नसल्याने शेतकऱ्यांची लावणीची कामे खोळंबली होती. मात्र, गुरुवारी रात्री पासून पावसाने जोर धरला आहे. काही ठिकाणी तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील मधुसुदन करंगुटकर यांच्या घरावर सागाचे झाड पडून घराचे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कसाल रेल्वे पुलाशेजारी, ओरोस राजधानी हॉटेल शेजारी झाड पडल्याने वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती. तसेच रानबांबुली येथे रेल्वे पुलाजवळ झाड पडल्याने या मार्गावरीलही वाहतूक ठप्प झाली होती. अखेर ग्रामस्थांच्या सहाय्याने झाडे बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. मात्र आपत्ती व्यवस्थापन कक्षाने संबंधित यंत्रणेला झाड पडल्याची कल्पना देऊनही संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी न आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. बोर्डवे रेल्वे ट्रॅकवर माती कोसळली, वाहतूक ठप्पकोकण रेल्वे मार्गावर कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथे रेल्वे ट्रॅकवर दुपारी १२ च्या दरम्यान माती कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, याच वेळेत मुंबईहून कोईमतूरला जाणारी बिकानेर-कोईमतूर एक्स्प्रेस कणकवली रेल्वे स्थानकात थांबविली होती. तर या घटनास्थळी तातडीने कोकण रेल्वेचे अभियंता व कर्मचारी दाखल होताच रेल्वे ट्रॅकवरील माती बाजूला करून दुपारी २.३० वाजता रेल्वेचा वाहतूक मार्ग मोकळा करण्यात आला.