शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंधुदुर्ग’ क्रीडा क्षेत्रात अग्रेसर

By admin | Updated: February 13, 2015 22:56 IST

संजय बावीस्कर : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा कणकवलीत प्रारंभ

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा हा क्रीडा क्षेत्राबरोबरच सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्यात कबड्डीसारख्या खेळाचा वारसा अविरतपणे सुरू असून यापुढेही तो सुरू रहावा यासाठी कुणाल बागवे मित्रमंडळासारखी मंडळे कार्यरत आहेत. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांनी केले.येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर गुरुवारी रात्री कुणाल बागवे स्मृती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, प्रांताधिकारी संतोष भिसे, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, अवधूत मालणकर, राजन वराडकर, नगरसेविका मेघा गांगण, माधुरी गायकवाड, रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, विशाल डामरी, नागेश मोरये, गौरव हर्णे, संजय मालंडकर आदी उपस्थित होते.संजय बावीस्कर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा कला-क्रीडा तसेच साहित्याचा पूजक आहे. येथे अनेक गुणवंत खेळाडू असून त्यांनी जिल्ह्याबरोबरच राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. खेळाडूंना नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे.संतोष भिसे म्हणाले, कोणत्याही उपक्रमात सातत्य राखत तो चालू ठेवणे कठीण असते. ही कठीण जबाबदारी या मंडळाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. अशाच पद्धतीने विविध उपक्रम राबवून या मंडळाने आपले समाजोपयोगी कार्य सुरू ठेवावे तसेच भविष्यात या मैदानावरून राज्यस्तरावरील खेळाडू निर्माण व्हावेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.स्पर्धेच्या उद्घाटनानंतर झालेल्या कबड्डी सामन्यातील खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने रसिकांना खिळवून ठेवले. कबड्डी रसिकांना स्पर्धा पाहण्यासाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)स्पर्धेतून मिळतो नवा आत्मविश्वासकुणाल बागवे मित्रमंडळाची कबड्डी स्पर्धा म्हणजे दिवंगत युवा कार्यकर्त्यांना वाहिलेली आदरांजली आहे. या स्पर्धेतून नव्या आशा आणि आत्मविश्वास आपल्याला मिळतो. म्हणूनच ही स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित केली जात असल्याचे संदेश पारकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.