शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पुन्हा भक्कम होण्याची लक्षणे

By admin | Updated: November 25, 2015 00:31 IST

सतीश सावंत : नगराध्यक्ष निवडणुकीनंतर वैभववाडीत पायी मिरवणूक

वैभववाडी : शिवसेना आणि भाजपच्या भांडणात विकास होणार नाही हे लक्षात आल्याने त्यांच्यातील काही सुज्ञ लोकांनी वैभववाडी आणि दोडामार्गची सत्ता काँग्रेसच्या हातात दिली आहे. त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो. काँग्रेस जिल्ह्यात पुन्हा भक्कम होण्याची ही लक्षणे आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या अपेक्षेप्रमाणे दोन्ही शहरे आदर्शवत बनविली जातील, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच वैभववाडी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काँग्रेसने संपूर्ण बाजारपेठत फटाक्यांची आतषबाजी करुन पायी विजयी मिरवणूक काढली. नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमिवर सावंत वैभववाडीत आले होते. नगराध्यक्षपदी रवींद्र रावराणे यांची निवड जाहीर होताच सावंत यांनी पुष्पहार घालून रावराणेंचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वैभववाडी आणि दोडामार्गात काँग्रेसचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आनंदात आहेत. वैभववाडीतील ग्रामविकास आघाडीत फूट पडली. अन्यथा आघाडीचे चौघेही आज एकत्र दिसले असते. भाजप आणि शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असूनही त्यांच्यातील भांडणे विकोपाला गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या भांडणात विकासावर परिणाम होत आहे. युतीतील भांडणाचा दोन्ही शहरांच्या विकासावर परिणाम होऊ नये म्हणून वैभववाडी आणि दोडामार्गची सत्ता काँग्रेसच्या हाती यावी अशी जनतेचीच इच्छा होती. अगदी त्या प्रमाणेच घडले आहे. सावंत पुढे म्हणाले, आमदार नीतेश राणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे वैभववाडीत काँग्रेसचे रवींद्र रावराणे नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. तर युतीकडे दहा नगरसेवक असूनही दोडामार्गात ते आपला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बसवू शकले नाहीत. ही काँग्रेस पुन्हा भक्कम होण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांच्या साथीने ही दोन्ही शहरे आदर्शवत बनविली जातील. कालावधीचा फॉर्म्युला वरीष्ठ नेतेच ठरवतील असेही सावंत यांनी स्पष्ट केले. वैभववाडीतील दोन्ही पदांच्या निवडीनंतर रावराणे व चव्हाण यांना पुष्पहार घालून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, नासीर काझी, बाळा हरयाण, बंड्या मांजरेकर, अंबाजी हुंबे, शुभांगी पवार, विश्राम राणे, काँग्रेसचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)राणेंमुळेच मी नगराध्यक्ष : रावराणे वाभवे-वैभववाडी नगराच्या विकासासाठी मतदारांनी मला बिनविरोध निवडून दिले. त्याबद्दल धन्यवाद देतो. मी काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असून काँग्रेस नेते नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्यामुळेच पहिल्या नगराध्यक्ष पदाचा मान मला मिळाला. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नगराध्यक्ष रवींद्र रावराणे यांनी स्पष्ट केले.