शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळातील आंबेडकरनगरला पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 23:53 IST

कुडाळातील आंबेडकरनगरला पुराचा वेढा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्याने बहुतांशी भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मंगळवारी रात्री भंगसाळ नदीला आलेल्या पुरामुळे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुडाळ शहरातील डॉ. आंबेडकर नगरातील सात ते आठ घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने येथील नागरिकांना रातोरात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. बुधवारी सायंकाळपर्यंत पूरस्थिती ‘जैसे थे’ होती.मालवण तालुक्यातील मसुरे खोतजुवा येथे कालावल नदीपात्रात सानिया साईप्रसाद खोत (वय ३५), नीलिमा नीलेश खोत (३५) आणि दीप्ती खोत (३६) या तीन महिला, दशरथ खोत (४५), नंदादीपक खोत (४0) हे दोन पुरुष व आर्यन खोत (९) हा मुलगा असे सहाजण खोतजुवा येथून मसुरे येथे नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी जात असताना पुरामुळे नदीपात्रात गेले. यावेळी किनारपट्टीवरील ग्रामस्थांनी अन्य होडींचा आधार घेत सर्वांना वाचविले. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली.नदीनाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी शेतात, बाजारपेठेत शिरले होते. पुराचे पाणी पुलांवरून वाहू लागल्याने तेथील वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून, लाखभर रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. बुधवारीसुद्धा दिवसभर आपली संततधार त्याने कायम ठेवली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दोडामार्ग तालुक्यातील कुडासे गावचे पूल पाण्याखाली गेले होते. केर, घोटगेवाडी, परमे यांना जोडणाऱ्या पुलावर अर्ध्या फुटापेक्षा कमी पाणी असूनही पुलाला रेलिंग नसल्याने व पाण्याचा वेग जास्त असल्याने येथील वाहतूक बंद होती.