शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: April 30, 2015 00:26 IST

सतीश सावंत : जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सर्व जागा जिंकेल

कणकवली : काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने आघाडी करून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संकल्प सिद्धी पॅनेल तयार केले आहे. या निवडणुकीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रदीप ढोलम, सुभाष मडव, बाबल आल्मेडा व सुगंधा साटम, आशिष परब या पाच जणांना काँग्रेस पक्षाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, असे सांगतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा विचार मानणाऱ्या मतदारांनी या पाच जणांना मतदान करू नये, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सावंत पुढे म्हणाले, ५ मे रोजी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. संकल्पसिद्धी पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली आहे. काँग्रेस नेते नारायण राणे, आमदार नीतेश राणे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित १८ जागांवरही काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. विरोधक काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्यानेच त्यांनी राष्ट्रवादीशी आघाडी केली अशी टीका करीत आहेत. मात्र, शिवसेना-भाजपासह सहा गट एकत्र येवूनही त्यांना या निवडणुकीसाठी १९ उमेदवार मिळू शकले नाहीत. त्यामुळे नेमके अध:पतन कोणाचे झाले आहे हे दिसून येते. उमेदवारी अर्ज भरण्याची ज्यांना माहिती नाही ते जिल्हा बँक काय चालविणार? असा प्रश्न निर्माण होतो, अशी टीकाही सावंत यांनी यावेळी केली.राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपामध्ये नेमके काय चालले आहे ते प्रथम पहावे आणि त्यानंतरच वक्तव्य करावे. जिल्हाध्यक्ष या नात्याने यापूर्वीही अनेक पदाधिकाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई करून राजीनामे घेण्याची हिंमत मी दाखविली आहे. त्यामुळे तेली यांनी त्याविषयी वक्तव्य करू नये.ते पुढे म्हणाले, केंद्रामध्ये सत्ता येवून एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. तर राज्यातील सत्तेला सहा महिन्यांचा कालावधी होऊनही जनतेचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत. लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीत मते मागताना अनेक आश्वासने शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी दिली होती. ती पूर्ण होऊ शकलेली नाहीत. वाळू व्यावसायिकांवर भाजपा-शिवसेनेमुळेच कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. होड्यांचे सील तोडणार असे सांगण्याची वेळ आमदारांवर आली आहे. मात्र, या समस्येला तेच कारणीभूत आहेत. (वार्ताहर)वाळू व्यावसायिकांच्या समस्येला केसरकर, नाईक कारणीभूतवाळू व्यावसायिकांच्या समस्या सोडविणार तसेच इको सेन्सिटीव्हचे भूत उतरविणार असल्याचे सांगत शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीत मते मागितली. मात्र केंद्रात तसेच राज्यात सत्ता येवूनही त्यांना हे शक्य झालेले नाही. वाळू व्यावसायिकांच्या समस्यांसाठी पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईकच कारणीभूत आहेत. सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागल्यास काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सावंत यांनी यावेळी दिला. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाहीजिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री दीपक केसरकर यांचा कोणताही प्रभाव दिसून येत नाही. पालकमंत्र्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध होत नसेल तसेच पोलीस त्यांचे ऐकत नसतील तर प्रशासनावर त्यांचा वचक नसल्याचेच स्पष्ट होत आहे. दीपक केसरकर अगतिक झाले असून त्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने जनतेचे प्रश्न ते सोडवू शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेऊन कॅबिनेट दर्जाचा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.. फौजदारी गुन्हा दाखल करणार३१ मे रोजी निवडणूकमालवण, कणकवली, वेंगुर्ले, कुडाळ, देवगड या पाच खरेदी-विक्री संघांची निवडणूक ३१ मे रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ५ मे पर्यंत आहे. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्यांनी २ मे पर्यंत तालुकाध्यक्षांकडे आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले.हिंमत दाखविण्यास सक्षमबबन राणे व महेश सारंग हे आमच्या पक्षात आहेत. त्यांची कामगिरी पाहून त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखविण्यासाठी मी सक्षम आहे. त्यामुळे राजन तेली यांनी त्याबाबतचा सल्ला देण्याची गरज नाही.