शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांसह कामगारांना फटका

By admin | Updated: August 15, 2016 00:06 IST

गौण खनिज : २२ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इको सेन्सिटीव्हबाबत बहुतांश ग्रामसभातून विरोधाचा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र केंद्राकडून अद्यापही निर्णय न झाल्याने जिल्ह्यात खाण, काळा दगड, चिरे, वीटा आदी व्यवसायासह घरबांधणीही धोक्यात आली आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेले शेकडो कामगार त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे. मात्र डेगवे गावात जर बंधने उठत असतील तर इतरांना वेठीस का धरले जात आहे? असा प्रश्न ओरोस येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा गौण खनिज संघटनेच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. याबाबत सोमवार २२ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. गौण खनिज संघटनेची बैठक रविवारी ओरोस येथील रवळनाथ मंदिरात झाली. बैठकीला प्रमोद कांबळी, अबीद नाईक, महादेव पारकर, नरहरी लिंग्रस, महेश सावंत, संतोष परब, प्रशांत चव्हाण, अनंत कांबळी, काका जेठे, सतीश बागवे, बाबा कोकरे, शिवाजी पालव, मायकेल डिसोझा, बिजेंद्र गावडे, मिलिंद दांडेकर, सदाशिव मोरये, मिलिंद साटम, नारायण हिंदळेकर, अशोक कुरडे आदी उपस्थित होते. जनतेला घरबांधणीसाठी साहित्य मिळणे कठीण झाले आहे. या व्यवसायावर उदरनिर्वाह असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यावसायिकदेखील कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता बैठकीत व्यावसायिकांनी व्यक्त केली. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेलाही बसत आहे. डेगवे गावात मात्र शासनाच्या फायद्यासाठी लोकांना वेठीस धरून मायनिंग होत असेल व पश्चिम घाटाशी दुरान्वयेही संबंध नसताना जनतेला व पारंपरिक गौण खनिज व्यावसायिकांना वेठीस धरले जात असेल तर कायदेशीर दाद मागण्याचे यावेळी ठरविले. यासाठी २२ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार शिष्टमंडळातर्फे त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)