शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

उपोषणाला अल्प प्रतिसाद

By admin | Updated: October 16, 2015 22:13 IST

बाराच जण सहभागी : माध्यमिक अध्यापक संघाच्या विविध मागण्या

सिंधुदुर्गनगरी : आपल्या विविध प्रलंबित दहा मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने शुक्रवारपासून जिल्हा परिषदेसमोर सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाला अल्प प्रतिसाद दिसून आला. या संघटनेत शेकडो शिक्षक सामील असतानादेखील या उपोषणात केवळ १२ जणांनीच सहभाग घेतला.जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षणसेवक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत वारंवार लक्ष वेधूनही माध्यमिक शिक्षण प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले होते. तर त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निर्णय घेण्यासाठी १३ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, या मुदतीत कोणतीही दखल न घेतल्याने माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारपासून उपोषणास सुरुवात केली आहे. मात्र जिल्ह्यात माध्यमिककडे शेकडो शिक्षक कार्यरत असूनही या बेमुदत उपोषणाला अत्यल्प प्रतिसाद दिसून आला. या उपोषणाला केवळ १२ शिक्षक सहभागी झाले होते.आजचे उपोषण माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांच्या गैरहजेरीत कार्याध्यक्ष लक्ष्मण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाले आहे. यामध्ये भिकाजी मगदूम, मारुती मनमाडकर, प्रकाश कानुरकर, राजन सावंत, संगीता खडसे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)प्रमुख मागण्या : आश्वासनाअंती उपोषण स्थगितसेवाज्येष्ठ शिक्षकांवर पदोन्नती देताना अन्याय झाला आहे, सन २०१५-१६ च्या त्रैमासिक सभेचे आयोजन नाही. शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यतेअभावी कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन रखडले आहे. वेतन देण्यास टाळाटाळ केली जाते असे विविध प्रश्न शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत. हे सर्व प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवावेत यासाठी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने शुक्रवारपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर हे विद्यमान जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती आहेत. तरीही जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी झगडावे लागत आहे. विविध मागण्यांसाठी माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, या उपोषणकर्त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी भेट घेत प्रलंबित मागण्या २६ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करू असे आश्वासन दिल्यामुळे सुरु केलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले. २६ आॅक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण सुरु करू अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पावसकर यांनी दिली.