शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

शिवसेनेची अवस्था सर्कशीतील वाघासारखी

By admin | Updated: May 13, 2016 23:41 IST

सचिन सावंत यांची टीका : संदीप सावंत यांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील

सावंतवाडी : खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवरच आरोप करून खळबळ माजवली. मात्र, शिवसेना अद्याप गप्प आहे. शिवसेनेत त्यावर प्रतिक्रियाही उमटत नसून शिवसेनेची अवस्था आता सर्कशीतील वाघासारखी झाली आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठीच योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहरअध्यक्ष सुधीर आडिवरेकर, संतोष जोईल, गुरू वारंग आदी उपस्थित होते. सचिन सावंत म्हणाले, खासदार किरिट सोमय्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवरच तसेच पीए व मेहूणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. पण शिवसेनेने त्यावर पलटवार केला नाही. शिवसनेने सत्य काय ते जनतेसमोर सांगितले पाहिजे. पण ते सांगितलेले नाही. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले. पण शिवसेनेने कोकणला काय दिले? आजही अनेक ठिकाणी विकास कामे ठप्प आहेत. सिंधुदुर्गला एक मंत्री पद दिले. पण त्याचा कोणताही फायदा कोकणला मिळत नाही. राज्याचे अर्थराज्यमंत्री असून, त्यांना फोटोसेशन पुरते दाखवले जाते. नंतर त्यांचा पत्ताच नसतो, असा आरोपही यावेळी सावंत यांनी केला आहे.राज्यात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होईल, असे सांगत असतानाच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कायमस्वरूपी मित्र आहोत, असे कोणी समजू नये, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. विधानसभेत दोन्ही पक्षांचे बळ लक्षात घेता युती शासनाच्या चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यासाठीच आम्ही एकत्र आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात भाजप सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे. त्यांच्याकडे ठोस कार्यक्रम राहिला नसल्याचे आरोपही सावंत यांनी यावेळी केला.चिपळणूचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना झालेल्या मारहाणीबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीच योग्य तो निर्णय घेतील, हा विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देईल का? असे विचारले असता तो निर्णय दिल्लीमध्ये होत असतो. त्यांच्याशी स्थानिक नेतृत्वाचा कोणताही प्रश्न नसतो. राणेंना उमेदवारी दिल्यास काँग्रेसचा आवाज विधान परिषदेत आणखी बुलुंद होईल. तसेच राणेंना कोणत्याही कुबड्यांची आवश्यकता लागणार नाही. ते काँग्रेसचे सामर्थ्यवान नेते आहेत. पक्षश्रेष्ठी त्यांच्या कार्याची निश्चितच दखल घेतील असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)