शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा जीव सत्तेतच : राणे

By admin | Updated: January 31, 2017 23:55 IST

युती महापालिकेपुरती तुटली; सिंधुदुर्गात राष्ट्रवादी कॉँग्रेसशी आघाडी करणार

सावंतवाडी : शिवसेना-भाजप युती महानगरपालिकेपुरती तुटली आहे. शिवसेनेचा सत्तेत जीव अडकल्याने ते सरकारमधून बाहेर पडू शकणार नाहीत आणि पडलेच तर सरकार पाच वर्षे टिकेल अशी व्यवस्था भाजपने करून ठेवली आहे, अशी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असून, तशी चर्चा सुरू असल्याचेही यावेळी राणे यांनी सांगितले.काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मंगळवारी सावंतवाडी तालुक्यात येऊन आगामी निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, सभापती प्रमोद सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, विशाल परब, माजी सभापती प्रियांका गावडे, आनंदी परब, प्रमोद गावडे, नगरसेवक राजू बेग, आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, शिवसेना आणि भाजपने यापूर्वीही अनेक निवडणुका वेगवेगळ्या लढल्या आहेत आणि त्यानंतर ते एकत्र आले आहेत. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचेही उदाहरण सर्वांसमोर आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना युती नकोच होती, फक्त केवळ लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी सर्व नाटके केली.जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. याबाबत माझी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र अद्याप भेटले नाहीत. त्यामुळे अजून चर्चा झाली नाही. काँग्रेसकडे विद्यमान ४२ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे जागावाटपाबाबत बोलणी करीत असताना सर्व बाजू विचारात घेतल्या जाणार आहेत. कार्यकर्त्यांशीही चर्चा केली जाईल.जी विकासकामे केली, निधी आणला म्हणून सांगतात, त्यांनी निधी कसा आणला, कोणत्या योजनेवर (पान ८ वर)दोन दिवसांत उमेदवारांची यादी सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी प्रत्येक ठिकाणी सात ते आठ उमेदवार इच्छुक आहेत. ही वस्तुस्थिती आहे, पण यामुळे बंडखोरी होईल, असे वाटत नाही. बंडखोरी होईल या भीतीने आम्ही उमेदवार घोषित केले नाहीत, ही अफवा चुकीची आहे. काँग्रेस दोन दिवसांत उमेदवारांची यादी घोषित करणार आहे. मी प्रचारदौऱ्यात असल्याने यादी जाहीर करण्यास उशीर झाल्याचे राणे यांनी सांगितले.