शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

राष्ट्रवादीला शिवसेनेचा ‘दे धक्का’

By admin | Updated: July 2, 2015 22:43 IST

केळवली जिल्हा परिषद गटात युतीचे सरवणकर विजयी

राजापूर : मागील दोन निवडणुकातील अपयश धुवून काढत शिवसेनेने केळवली जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत यश मिळवले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लढतीत शिवसेनेचे रामचंद्र सरवणकर यांनी काँग्रेस आघाडीचे दीपक बेंद्रे यांचा ८७० मतांनी पराभव केला. सात वर्षांनंतर केळवली जिल्हा परिषद गटावर पुन्हा भगवा फडकला. राष्ट्रवादीचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिनेश जैतापकर हे अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या केळवलीच्या जागेसाठी ३० जूनला मतदान घेण्यात आले. एकूण १० हजार २६४ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. गुरुवारी सकाळी १० वाजता राजापूर तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. दोन्ही उमेदवारांसह त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात उपस्थित होते.मतमोजणीअंती पहिल्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार दीपक बेंद्रे यांना १३८६, तर शिवसेनेचे रामचंद्र सरवणकर यांना १९१६ मते मिळाली होती. यावेळी सरवणकर ५३० मतांनी आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीत दीपक बेंद्रे यांनी १६ मतांची नाममात्र आघाडी घेतली. या फेरीत बेंद्रे यांना २२१७, तर सरवणकर यांना २२०१ मते मिळाली होती. अखेरच्या ७ मतदान केंद्राचा कौल कोणती दिशा घेतो, त्यावरच विजयाचे गणित ठरणार होते. या फेरीत बेंद्रे यांना ९१८, तर सरवणकर यांना १२७३ मते मिळाली आणि शिवसेनेने केळवलीचा गड काबीज केला. शिवसेना उमेदवार रामचंद्र सरवणकर ८७९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले.या निवडणुकीसाठी एकूण १० हजार २६४ मतदान झाले होते. त्यापैकी बेंद्रे यांना ४ हजार ५२१, तर रामचंद्र सरवणकर यांना ५ हजार ३७ मते पडली. ३५३ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला.या विजयानंतर आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, केळवलीचे विभागप्रमुख नरेश दुधवडकर, शहरप्रमुख अनिल कुडाळी, महिला आघाडीप्रमुख योगिता साळवी, नगरपरिषदेचे गटनेते अभय मेळेकर, यांच्यासह सर्वांनी जल्लोष केला. (प्रतिनिधी)हा विजय शिवसैनिकांसह पक्षाच्या ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकारी यांचा असून केळवली जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू.- रामचंद्र सरवणकरनूतन जिल्हा परिषद सदस्यया विजयाने सेना राजापूर तालुक्यात भक्कम असून, दीड वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीत असेच घवघवीत यश मिळवण्यासाठी सज्ज रहा.- आमदार राजन साळवीराजापुरात जिल्हा परिषद संख्याबळ वाढून ते पाच एवढे झाले आहे तर मित्रपक्ष भाजपचा एक सदस्य असे मिळून सहावर पोहोचले आहे. युतीने सहाच्या सहा जागा जिंकून काँग्रेस राष्ट्रवादीला भुईसपाट केले आहे. काँग्रेसचे कोदवलीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुरव यापूर्वीच भाजपात गेले. राष्ट्रवादीचे सदस्य अपात्र ठरल्याने आघाडीची पाटी कोरी राहिली आहे.