सावंतवाडी : मालवणमध्ये पैसे वाटपावरून भाजप व शिंदे सेनेत धुमश्चक्री सुरू असतानाच सावंतवाडीतमतदानाच्या दिवशी सकाळीच पैसे वाटपाच्या संशयावरून शिंदेसेना व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र वेळीच पोलिसांकडून तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर प्रभाग सातमध्ये पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.सावंतवाडी शहरातील प्रभाग सात येथे हाय व्होल्टेज लढत असून वातावरण तणावपूर्ण आहे. अशातच खासकीलवाडा भागात मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या संशयावरून शिंदे गट आणि भाजपचे समर्थक एकामेकांच्या अंगावर धावून गेले. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भाजप समर्थकांवर पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. दरम्यान या घटनेनंतर प्रभाग सातमध्ये पोलिसांकडून वाढीव बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलिस घेत आहेत. पोलिसांनी तत्काळ धाव घेत दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला करत वातावरण शांत करुन मतदान सुरळीत ठेवले.
Web Summary : Tensions flared in Sawantwadi during local elections as Shinde Sena and BJP workers clashed over suspected vote-buying. Police intervened, preventing a major incident in Ward 7. Increased security measures are now in place to ensure peaceful voting.
Web Summary : सावंतवाड़ी में स्थानीय चुनावों के दौरान शिंदे सेना और भाजपा कार्यकर्ताओं के बीच वोट खरीदने के संदेह पर झड़प हो गई। पुलिस ने हस्तक्षेप किया, जिससे वार्ड 7 में एक बड़ी घटना टल गई। शांतिपूर्ण मतदान सुनिश्चित करने के लिए सुरक्षा बढ़ाई गई है।