आंबोली : आंबोली गावठवणवाडीत परिसरात राहणाऱ्या गणपत राऊत, लक्ष्मण राऊत व कांता राऊत यांच्या मालकीची सात गुरे बुधवारी झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेली. ओढ्याच्या काठी चरत असताना वाहून गेलेली सातही गुरे मृतावस्थेत हिरण्यकेशी नदीत आढळून आली. यामध्ये चार म्हैशी व तीन रेडकांचा सामावेश आहे. यामुळे राऊत कुटुंबियांचे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी के. बी. राणे यांनी सांगितले. आंबोली तलाठी कार्यालयातील कोतवाल लाडू गावडे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. या घटनेतील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विद्यासागर गावडे यांनी केली आहे. (वार्ताहर)
आंबोलीतील सात गुरे वाहून गेली
By admin | Updated: August 3, 2014 01:58 IST