शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : नियम धाब्यावर, कणकवली बाजारपेठेत गर्दी, खरेदीसाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 15:51 IST

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारपासून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी कणकवली बाजारपेठेत सकाळी ८ वाजल्यापासून आठवडा बाजार भरल्याप्रमाणे गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पूर्णत: धाब्यावर बसविण्यात आला होता.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा नियम बसविला धाब्यावर!कणकवली बाजारपेठेत गर्दी : खरेदीसाठी झुंबड

कणकवली : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारपासून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी कणकवली बाजारपेठेत सकाळी ८ वाजल्यापासून आठवडा बाजार भरल्याप्रमाणे गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पूर्णत: धाब्यावर बसविण्यात आला होता.बाजारपेठेत वारंवार होणाऱ्या अशा गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता असतानाही त्याकडे अनेक नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण कसे आणणार? असा प्रश्न प्रशासन, नगरपंचायत तसेच पोलिसांना पडला आहे.कणकवली शहरात मुख्य बाजारपेठ व डिपीरोड या दोन्ही रस्त्यांवर काही जीवनावश्यक वस्तंूची दुकाने चालू आहेत. त्यामुळे किराणामालाचे दुकान, भाजी-पाला, औषधे, कांदे, बटाटे, दूध हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांकडून मर्यादित अंतर ठेवण्याचा नियम पायदळी तुडविला जात आहे. काही औषध दुकाने तसेच अन्य काही दुकानांमध्ये साहित्य खरेदी करताना ३ फुटांचे मर्यादित अंतर नगरपंचायतीने मारून दिलेल्या चौकोनात उभे राहून पाळले जात आहे.मात्र, कणकवली बाजारपेठ व डिपी रोड, तेलीआळी या रस्त्यांवर अत्यंत धोकादायक पद्धतीने गर्दी होत आहे. नागरिक कुठलाही विचार न करता थेट रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. कोरोना बाधित रुग्णांची संख्या कणकवलीसह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, त्याचे गांभीर्य नसलेल्या नागरिकांना कोण रोखणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.पोलीस आपला जीव धोक्यात घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांनी कडक कारवाईचे पाऊल उचलले की, त्यांना दोष देत कारवाई न करण्याची मागणी अनेकांकडून केली जाते. त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना मर्यादा येत आहेत.बाजारात तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे आपला स्वत:चा जीव तर धोक्यात घालतच आहेत. त्याचबरोबरच इतरांच्या जीवलाही धोका निर्माण करीत आहेत. याचे भान त्यांना राहत नाही. हे मोठे दुर्दैव आहे. नागरिकांनी यापुढे तरी निदान घराबाहेर न पडता आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन कणकवली नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. 

टॅग्स :Marketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग