शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात मच्छिमार नौका उलटण्याचे सत्र सुरूच

By admin | Updated: August 20, 2016 00:10 IST

धुरीवाडा किनारी घटना : आठवड्यात चौथा प्रकार

मालवण : गेले काही दिवस समुद्रात सकाळच्या वाऱ्याचा वेग कायम असून, लाटांनीही जोर पकडला आहे. याचा फटका मासेमारी नौकांना बसला असून, आठवड्याभरात समुद्रात चार नौका उलटण्याच्या घटना घडल्या आहेत. राजकोट, वायरी, मुणगे (ता. देवगड) आणि आता पुन्हा शहरातील धुरीवाडा चिवला बीच समुद्रात शुक्रवारी भल्या पहाटे नौका उलटण्याची घटना घडली आहे. नौकेतील चारही मच्छिमारांनी पहाटेच्या काळोखात उसळणाऱ्या लाटांचा सामना करीत किनारा गाठला. धुरीवाडा येथील तुळशीदास गोवेकर यांची ‘कृष्णा’ मासेमारी नौकेसह इंजिन व जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत होतो, अशी मच्छिमारांची भावना असते. मात्र, समुद्र अजूनही शांत झाला नसल्याने मच्छिमारांना मासेमारी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढत असल्याने जोरदार लाटा उसळत असून, शुक्रवारी पहाटे ‘कृष्णा’ मासेमारीस गेलेली नौकापलटी झाली. यात मंगेश खोर्जे, नामदेव अडुवरेकर, अरुण जोशी व सुशांत गोवेकर हे चौघे मच्छिमार होते. किनारपट्टीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर जोरदार लाटांच्या तडाख्यात नौका पलटी झाली. काळ्याकुट्ट अंधारात चारही मच्छिमारांनी उसळणाऱ्या लाटांचा सामना करत किनारा गाठला. (प्रतिनिधी)...तर मत्स्य कार्यालयास टाळे ठोकणारखवळलेल्या समुद्रात नौका उलटण्याच्या घटना घडत आहेत. पंचनाम्यासाठी अधिकारी उपस्थित होत नाहीत. अन्य कागदपत्रांची पूर्तता धीम्या गतीनेच सुरू आहे. याबाबत मालवण, तळाशील, धुरीवाडा व दांडी येथील मच्छिमारांनी मत्स्य कार्यालयावर धडक दिली. मात्र अधिकारीच उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले. प्रभारी साहाय्यक मत्स्य आयुक्त ‘नॉट रिचेबल’ तर आठ दिवसांपूर्वी हजर झालेले अधिकारीही सुट्टीवर गेले होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी हा प्रश्न आपल्या अखत्यारित नाही, असे सांगत हात वर केले. त्यामुळे संतप्त बनलेल्या मच्छिमार प्रतिनिधी बाबी जोगी, दिलीप घारे, संजय केळुस्कर, सन्मेश परब यांच्यासह अन्य मच्छिमारांनी अधिकारी हजर न झाल्यास सोमवारी मालवण येथील जिल्हा मत्स्य कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.