शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेतू कर्मचारी पगाराविना

By admin | Updated: March 12, 2015 00:03 IST

उपासमारीची वेळ : दोन महिने वेतनच नाही

असगोली : येथील सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहेत. यामुळे सध्या ऐन शिमगोत्सवात येथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.सध्या सेतू कार्यालय आॅनलाईन करुन तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याप्रमाणे तहसील कार्यालयाच्या अखत्यारित काम करणारे सर्व कर्मचारी नियमितपणे काम करत असूनही गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. येथील कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात तहसीलदार वैशाली पाटील निवेदन दिले आहे.जानेवारी २०१५पासून गुहागरातील सेतू कार्यालय आॅनलाईन करुन तहसील कार्यालयाच्या ताब्यात घेण्यात आले. या कालावधीत पूर्वी कंत्राट पद्धतीमध्ये काम करणारे व सध्या तहसील कार्यालयाच्या अखत्यारित काम करणाऱ्या सेतू कार्यालयामधील सर्व पाच कर्मचाऱ्यांनी आपले नियमित काम केले.जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे वेतन अद्याप त्यांना देण्यात आलेले नाही. हे सर्व कर्मचारी दरमहा मिळणाऱ्या तूटपुंज्या वेतनावरच आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. परंतु दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने या सर्व कर्मचाऱ्यांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता अद्याप आपल्याला शासनाच्या वरिष्ठ पातळीवरुन सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना द्यावयाचा पगाराच्या रकमेबाबत आदेश प्राप्त झालेले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर नाईलाजास्तव हे सेतू कार्यालय बंद करण्याची वेळ येणार असल्याचे या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनासंदर्भात गुहागर तहसील प्रशासन कोणती भूमिका घेते, यावर या सेतू कार्यालयाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे होणारे संभाव्य हाल लक्षात घेऊन याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी....येत्या सात दिवसात कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत योग्य तो निर्णय व कार्यवाही न झाल्यास पुढे होणाऱ्या परिणामास कर्मचारी जबाबदार राहणार नसल्याचेही निवेदनामध्ये म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि उपविभागीय कार्यालय, चिपळूण यांनाही देण्यात येणार आहेत. याप्रकरणी गांभीर्याने लक्ष पुरवण्याची मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे.