शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

परिसर स्वच्छतेसाठी छायाचित्र पाठवा !

By admin | Updated: October 18, 2015 23:30 IST

पोलिसांचा अभिनव उपक्रम : श्रमदानात अधीक्षकांचा सहभाग

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग पोलीस दलाने श्रमदानातून स्वच्छता अभियान हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. दर गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांपासून पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व सहभागी होऊन हे स्वच्छता अभियान राबविणार आहेत. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणच्या अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणचे फोटो पाठविल्यास त्या-त्या ठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.पोलीस आस्थापनेवरील विविध कार्यालये, वसाहती व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहिल्यास काम करण्याचा उत्साह व कार्यक्षमता वाढीस लागते. तसेच दररोज नव्याने भर पडणाऱ्या आव्हांनाचा सामना करण्यासाठी पोलिसांनी सज्ज असावे या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक शिंदे यांनी हे अभियान सुरू केले आहे.याचाच एक भाग म्हणून श्रमदानातून स्वच्छता अभियानांतर्गत सुरुवातीला पोलीस कार्यालयाचा परिसर, पोलीस वसाहतींचा परिसर, जिल्हा पोलीस मुख्यालय व ज्या ठिकाणी पोलीस ठाणे आहे त्या शहरातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यात येईल. हे अस्वच्छ ठिकाण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित असेल तर संबंधित ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेला सहकार्य व सहभागाबाबत विनंती केली जाईल व पोलीस आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संयुक्त अभियानातून परिसर स्वच्छ केला जाईल.या अभियानातून श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, अस्वच्छतेपासून स्वच्छतेकडे संपूर्ण परिसराचे रूपांतर व्हावे, पोलीस व जनता यांच्यात आपुलकीचे संबंध निर्माण व्हावेत, अशी विविध उद्दिष्ट्ये ठेवण्यात आली आहेत. या अभियानाचे समन्वय अधिकारी म्हणून व्ही. व्ही. सहस्त्रबुद्धे यांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमात भरभरून प्रतिसाद देऊन संपूर्ण जिल्हा स्वच्छ करण्यास जनतेने हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केले . (प्रतिनिधी) ३३ अधिकारी सहभागी : एकाच वेळी सर्वत्रदर गुरुवारी सकाळी ७ ते ९ या कालावधीसाठी असला तरी जिल्ह्यातील किमान १४ ठिकाणी एकाचवेळी हा उपक्रम राबविला जाईल. याची सुरुवात शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसर स्वच्छ करून झाली. यात पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, वाहतूक शाखा, श्वानपथक, जिल्ह्यातील १३ पोलीस ठाणी व दोन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये यांची स्वच्छता ३३ अधिकारी व १७६ कर्मचारी यांनी केली.