शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शोधमोहीम मंदावली

By admin | Updated: August 7, 2016 23:20 IST

सावित्री पूल दुर्घटना : वाहनांचाही तपास नाही; १५ प्रवासी अद्यापही बेपत्ता

महाड : सावित्री पूल दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ४२ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांचे मृतदेह नदी किनाऱ्यावर सापडले असून यापैकी १५ बेपत्ता प्रवाशांचा शोध लागला नसल्याने शोधकार्यात गेल्या पाच दिवसांपासून गुंतलेली यंत्रणा चक्रावून गेली आहे. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन एसटी बसेसह एका तवेरा जीपचा छडा अद्यापही लागला नाही. या वाहनांचा शोध घेण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचाही गेल्या दोन दिवसांपासून वापर केला जात असून या अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात असूनही या शोधपथकाला या वाहनांचा वेध घेता येणे अशक्य झाल्याचे दिसून येत आहे. नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या एसटी बसचा महिलांसाठी आरक्षित हा लोखंडी पत्र्याचा फलक, घटनास्थळापासून तीन ते चार किती अंतरावरील विसावा हॉटेलच्या मागील बाजूस शनिवारी सापडला तर बसच्या सिटचा भागदेखील वराठी जवळ पाण्यात वाहून जाताना सापडला. रविवारी दिनेश सखाराम कांबळे, रमेश सखाराम मिरगल, अविनाश सखाराम मालप, जयेश गोपाळ बने हे चार मृतदेह वहूर आंबेत, वेश्वी ओवळे अशा विविध किनाऱ्यावर आढळून आले. स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांनी हे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून प्रशासनाच्या ताब्यात दिले. मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये किंवा नोकरी : दिवाकर रावते अडरे : एस.टी.तील कर्मचारी व एस.टी. प्रशासन यांच्यात माझे भावनिक नाते निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील. महामंडळ पुढे न्यायचे असेल तर कर्मचारी आणि प्रशासन हातात हात घालून चालले पाहिजेत. त्यासाठी भावनिक नाते असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. मुंबई-गोवा महामार्गावरील महाड राजेवाडी येथील पूल कोसळल्याने दोन एस. टी. वाहून गेल्या. या दुर्दैवी घटनेत वाहून गेलेल्या श्रीकांत कांबळे, महेंद्र कांबळे, प्रभाकर शिर्के यांचे मृतदेह सापडले. त्यांना श्रद्धांजली वाहताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, हा अपघात जरी असला तरी अशी दुर्घटना घडते, ही एस. टी. महामंडळाचे दुर्दैव आहे. या घटनेत मृत्यू आलेल्यांना १० लाख रुपये किंवा अनुकंपाखाली नोकरी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. रविवारी सकाळी ९.३० वाजता परिवहन मंत्री रावते यांनी चिपळूण आगाराला भेट दिली. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, माथाडी कामगार संघटनेचे सुधीर पालांडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, नगरसेवक शशिकांत मोदी, राजू देवळेकर, राकेश शिंदे, राजू भागवत, नित्यानंद भागवत, भैय्या कदम, महेंद्र डिगे, संतोष महाडिक, संदेश आयरे, आगार व्यवस्थापक रमेश शिलेवंत, एस. टी. कामगार संघटनेचे रवी लवेकर, संजय रसाळ, सुनील सावंतदेसाई, शेषनाथ घाग, प्रकाश बल्लाळ, शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेचे शैलेंद्र सुर्वे, सुनील गमरे, मुन्ना कदम, प्रमोद नलावडे व एस.टी.तील कामगार उपस्थित होते. परिवहन मंत्री रावते यांनी एस. टी. महामंडळाला भेट दिल्यानंतर काविळतळी येथील मृत पावलेल्या आसिफ चौगुले व आवेश चौगुले यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.