शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

क्षमता नसताना सीमकार्ड वाटली

By admin | Updated: December 26, 2014 23:45 IST

काँग्रेसचा आरोप : बीएसएनएलच्या टॉवरबाबत आक्षेप; अधिकाऱ्यांना घेराओ

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात सतत बीएसएनएलच्या सेवेत येणारा व्यत्यय तसेच टॉवरची क्षमता नसतानाही खासगी वितरकाच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात सीमकार्ड वाटण्यात आली आहेत, असा आरोप करत काँग्रेसच्यावतीने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून शुक्रवारी घेराओ घालण्यात आला. यावेळी बीएसएनएलचे जनरल मॅनेजर बी. एस. बिराजदार यांनी ही सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आश्वासन दिले, तर काँग्रेसने बीएसएनएलला २० जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा २६ जानेवारीला उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.या घेराओमध्ये शहराध्यक्ष मंदार नार्वेकर, अतुल पेंढारकर, संजू शिरोडकर, अ‍ॅड. अनिल निरवडेकर, दिलीप भालेकर, सुधीर आडिवडेकर, संतोष गावस, सत्यवान बांदेकर, नसीर पडवेकर, मीना माटेकर, गोविंद प्रभू, इरफान खान, वैष्णवी ठोबरे, सुफीयान शेख, अमेय प्रभूतेंडूलकर, सुनील इंगळे आदी उपस्थित होते.यावेळी काँॅग्रेसने घेराओवेळी अनेक प्रश्न उपस्थित केले. यात सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात बीएसएनएल सेवा खंडित असते. अनेक वेळा रेंजचा प्रश्न ऐरणीवर असतो मात्र, बीएसएनएलच्या कार्यालय दूरध्वनी केला असता उत्तरे योग्य प्रकारे मिळत नाहीत, असा सवाल अतुल पेंढारकर यांनी उपस्थित केला. ही सेवा तातडीने सुरळीत करा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येणार असून तुम्ही लोकांची दिशाभूल करण्याचे सोडून द्या.गरजेपेक्षा जास्त सिमकार्ड कशाला वाटली, असा सवाल ही काँॅग्रेसने उपस्थित केला. तसेच टॉवरची क्षमता किती सीमकार्डची मग एवढी सीमकार्ड का वाटली. यामागे तुमचा हेतू काय, की खासगी ठेकेदाराना तुम्हाला मोठे करायचे आहे, असा प्रश्न ही काँॅग्रेसने विचारला. यानंतर काँग्रेसच्यावतीने बीएसएनएलला २० जानेवारीची मुदत दिली असून यामुदतीत काम पूर्ण झाले नाही तर २६ जानेवारीला आम्ही बीएसएनएल कार्यालयाशेजारी उपोषण बसणार, असे ही स्पष्ट केले.बीएसएनएलचे जनरल मॅनेजर बी. एस. बिराजदार यांनी लवकरात लवकर ही सेवा योग्य प्रकारे सुरू करू. भविष्यात ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)