शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

देवबागमध्ये सागरी अतिक्रमणाने थरकाप

By admin | Updated: June 17, 2014 01:17 IST

प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना

मालवण : गेले आठ दिवस मालवण किनारपट्टीवर समुद्राला उधाण असून, देवबाग गावाला आजही सागराच्या अजस्र लाटांनी घेरले. सुमारे अडीच मीटर उंचीच्या लाटांनी देवबागात प्रवेश केल्याने देवबागवासीयांचा थरकाप उडाला. आज सोमवारच्या सागरी अतिक्रमणात देवबागवासीयांचे माड जमीनदोस्त झाले, तर सागराच्या महाकाय लाटांनी देवबाग भाजीवाडी येथील दगडी बंधारा उद्ध्वस्त करून टाकला. आज दुपारी मालवणच्या तहसीलदार वनीता पाटील यांनी देवबाग गावाची पाहणी करून सागरी अतिक्रमणग्रस्त देवबागवासीयांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या सूचनांचा कोणताही परिणाम देवबागवासीयांवर झाला नाही. आज पावसाने दिवसभर विश्रांती घेतली असली तरी (पान १ वरून) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास देवबागच्या समुद्रात उधाण निर्माण झाले. सुमारे अडीच मीटर उंचीच्या महाकाय लाटांनी तांडवनृत्य केले. देवबाग मधलीवाडी येथे फ्रान्सीस जुनाव सोझ यांच्या मालकीचे माड सागराच्या लाटांनी जमीनदोस्त केले. भाजीवाडीतील जवळपास ५० ते ७५ फूट जमीन सागराने आपल्या पोटात घेतली आहे. भाजीवाडी येथील स्वप्निल साळगांवकर यांच्या हॉटेललाही सागराच्या लाटांनी आजही घेरले होते. भाजीवाडीतील शासनाने घातलेला संरक्षक बंधारा समुद्राने उद्ध्वस्त केला आहे. या लाटांनी बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे. देवबाग येथील संतोष नेवाळकर यांच्या घरात लाटांचे पाणी घुसले. स्थलांतराच्या सूचना मालवणच्या तहसीलदार वनीता पाटील यांनी देवबागची पाहणी केली. य्तहसीलदारांनी पं. समितीचे सदस्य देवानंद चिंदरकर यांच्याशी चर्चा केली. पाटील यांनी देवबागवासीयांना स्थलांतराच्या सूचना केली असता ग्रामस्थ आमचे ऐकत नसल्याचे सांगितले. त्यावर तहसीलदारांनी स्थलांतरासाठी लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांची मने वळविली पाहिजेत, असे सांगून जर उद्या काही विपरित घडले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)