शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे ‘सागर बंगला’ बंद ::

By admin | Updated: May 4, 2016 00:33 IST

पर्यटकांचे आकर्षण : वेंगुर्ले नगरपरिषदेने पाण्याची व्यवस्था करावी

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरातील बंदरावरील सागर बंगला म्हणजेच शासकीय विश्रामगृह हे पर्यटकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. देशातील प्रतिष्ठित व्यक्ती या बंगल्यावर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात. सध्या पाणीटंचाई या एका कारणास्तव वेंगुर्लेतील हा बंगला गेल्या महिन्यात पूर्णत: बंद राहिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने व वेंगुर्ले नगरपरिषदेने पाण्याची व्यवस्था करून हा बंगला कायमस्वरूपी सुरू ठेवणे गरजेचे आहे.वेंगुर्ले शहरापासून अवघ्या एक-दीड किलोमीटर अंतरावर हा बंगला उभा आहे. वेंगुर्ले शहरातून गाडी सरळ बंदराच्या दिशेने निघाली की ज्या ठिकाणी गाडी थांबवून पार्किंग करावी लागते, त्या ठिकाणावर उभे राहून वर नजर टाकली की हा सागर बंगला दृष्टीस पडतो. तेथे गेलेल्या प्रत्येकाला तेथे जाण्याची ओढ निर्माण होते. रस्त्यावरून सुरू होणाऱ्या पायऱ्या चढत चढत जेव्हा आपण त्या बंगल्यासमोर पोहोचतो, तेव्हा आपल्याला विशाल समुद्र दृष्टीस पडतो. त्याच्या एका बाजूला पाहिले तर पुन्हा वरवर जाणाऱ्या पायऱ्या दिसून येतात, ती वाट जाते थेट वेंगुर्लेच्या दीपगृहाकडे. आल्या रस्त्याकडे पाठमोरे होऊन जर आपण मागे पाहिले तर सुंदर अशी वेंगुर्लेची खाडी व बंदर जेटी पाहावयास मिळते. त्या बंदरामध्ये नांगरून ठेवलेल्या मच्छिमारांच्या बोटींचे दर्शनही विलोभनीय असते. उंचावर, एकाच ठिकाणावरून सकाळी सूर्यदर्शन व सायंकाळी सूर्यास्त पाहण्याची संधी याठिकाणी मिळते. मात्र, सध्या उष्म्याचे प्रमाण वाढल्याने नगरपरिषदेकडून येणारे दोन दिवसाआड पाणी ठेवून विश्रामगृह चालवणे शक्य नसल्याचे कारण पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने एक-दोन दिवसांपासून नव्हे, तर गेल्या महिन्यापासून हे विश्रामगृह म्हणजेच सागर बंगला बंद ठेवला आहे. सागर बंगला शेवटच्या टोकाला असल्याने तिथपर्यंत पाणी सुरळीत होत नाही. सागर बंगल्यावर बुकिंग करून पाहुणे आले तर पाणीप्रश्न निर्माण होईल म्हणून बांधकाम विभागाने हा सागर बंगला सध्या बंद ठेवला आहे. परिणामी, पर्यटकांमधून व वेंगुर्लेवासीयांमधून याबाबत नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करून हा सागर बंगला सुरू करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)