शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘स्कुबा डायव्हिंग’ आजपासून अधिकृत

By admin | Updated: November 11, 2015 00:13 IST

प्रशासनाचा ‘हिरवा कंदील’ : अनधिकृत व्यावसायिकांवर होणार कारवाई

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या जलक्रीडा प्रकारातील स्कुबा डायव्हिंगला जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. सिंधुदुर्ग जलक्रीडा सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून मालवणातील २४ व्यावसायिकांनी ‘एक खिडकी’च्या माध्यमातून सुरु केलेल्या परवाना प्रक्रियेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. परवाना नसतानाही पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन सुरु असणाऱ्या व्यवसायास शासनाकडून मान्यता मिळण्यासाठी मालवणातील स्कुबा व्यवसायिकांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करत परवान्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेला स्कुबा डायव्हिंग जलक्रीडा प्रकारासाठी परवानगी दिली आहे. दिवाळी पर्यटन हंगामात बुधवार ११ नोव्हेंबरपासून स्कुबा डायव्हिंग हा जलक्रीडा प्रकार सिंधुदुर्ग किनारपट्टीवर अधिकृतरित्या पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. अनेक प्रकारच्या जलक्रीडापैकी स्कुबा डायव्हिंग या पहिल्याच प्रकाराला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिल्याने अन्य जलक्रीडा प्रकारही मान्यतेच्या छत्राखाली येतील अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. मालवण तहसीलदार दालनात मंगळवारी तहसीलदार वनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्कुबा डायव्हिंग परवान्याबाबत बैठक पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रुपेश प्रभू, सचिन गोवेकर, दामू तोडणकर, सतीश आचरेकर आदी स्कुबा डायव्हिंग व्यवसायिक उपस्थित होते. तहसीलदार पाटील यांनी व्यावसायिकांना अटी, शर्ती व नियमांची माहिती दिली. बंदर निरीक्षकांनाही व्यवसायावर लक्ष ठेवण्याचे आदेश देत अनधिकृत व्यावसायिक व नियम मोडणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)