शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्कुबा डायव्हींगला ‘पॅडी’ची मान्यता

By admin | Updated: January 20, 2015 23:50 IST

तारकर्ली जगाच्या नकाशावर : आशिया खंडातील पहिलाच प्रकल्प

संदीप बोडवे - मालवण -सिंधुदुर्गच्या किंबहुना देशाच्या पर्यटनात ‘निलक्रांती’ घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे उभारलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्युट आॅफ स्कुबा डायव्हींग अ‍ॅण्ड अ‍ॅक्वाटीक स्पोर्टस’ या स्कुबा डायव्हींग सेंटरला आजअखेर ‘पॅडी’ या संस्थेची मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प जगाच्या नकाशावर आला असून आशिया खंडातील तो एकमेव प्रकल्प आहे. ‘पॅडी’चे एशिया पॅसिफिकचे विभागीय व्यवस्थापक अ‍ॅन्ड्रेस अवूर यांनी आॅक्टोबरमध्ये स्कुबा डायव्हींग सेंटरला भेट देऊन निकषांची तपासणी केली होती. आंतरराष्ट्रीय मानकानुसार सर्व निकष पूर्ण केल्यानंतर येथील स्कुबा डायव्हींग सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता मिळाली आहे. या संस्थेशी संलग्न राहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथील स्कुबा डायव्हींग प्रकल्प हाती घेतला आहे. या संस्थेच्या अटी, शर्थी व मानांकनानुसार स्कुबा डायव्हींग प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा आशिया खंडातील एकमेव प्रकल्प आहे. या सेंटरची तपासणी करण्यासाठी पॅडीच्यावतीने अ‍ॅन्ड्रेस अवूर यांनी भेट दिली होती. यावेळी अवूर यांनी आंतरराष्ट्रीय निकषांनुसार स्कुबा डायव्हींग सेंटरची कसून तपासणी केली होती. या सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता मिळण्यास काहीच हरकत नाही, असा विश्वास निरीक्षक अ‍ॅन्ड्रेस अवूर यांनी व्यक्त केला होता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे साकारलेल्या ‘आयआयएसडीए’ (इसदा) अर्थात स्कुबा डायव्हींग सेंटरच्या आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या सर्व अटी व निकष या प्रकल्पाने पूर्ण केल्या आहेत. पॅडी म्हणजे काय... प्रोफेशनल असोसिएशन आॅफ डायव्हींग इन्स्ट्रक्टर्स (पॅडी) ही आॅस्ट्रेलियातील स्कुबा डायव्हिंग सेंटर्सचे मानके निश्चित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जगभरात १८० पेक्षा जास्त देशांमध्ये ‘पॅडी’ची डायव्हींग सेंटर आहेत. असे आहे सेंटर४तारकर्ली येथील या डायव्हिंग सेंंटरमध्ये १० मीटर खोलीचा स्विमिंग टँक, प्रशस्त व अद्ययावत क्लासरूम, संगणकीय लॅब, चेंजिंग रूम, आॅक्सिजन युनिट, फिल्टरेशन युनिट यांचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकन बनावटीच्या तीन स्पीड बोटींचाही समावेश यात आहे.जगातील स्कुबा डायव्हिंग सेंंटरला मान्यता देणाऱ्या पॅडी संस्थेने तारकर्लीच्या सेंटरला मान्यता दिली हे देशाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. याचा लाभ घेणाऱ्यास आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळेल.- सुबोध किन्हळेकर, व्यवस्थापक, साहसी क्रीडा विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई.गेल्या कित्येक वर्षांच्या मेहनतीचे फळ आम्हाला मिळालेले आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जगाच्या नकाशावर येत आहे.- डॉ. सारंग कुलकर्णी, जनरल मॅनेजर अ‍ॅन्ड चीफ इन्स्ट्रक्टर, इसदा, तारकर्ली