शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

अधिवेशनाच्या काळातच विज्ञानप्रदर्शनाचा घाट

By admin | Updated: December 2, 2014 00:28 IST

आमदारांना विश्वासात न घेताच ठरवली तारीख

सावंतवाडी : गेली पाच वर्षे सावंतवाडीची आमसभा झाली नसताना आता ऐन विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावरच विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचा घाट पंचायत समितीने घातला आहे. याबाबतचे निमंत्रण देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे गेले होते. मात्र, केसरकरांनी विज्ञान प्रदर्शनाच्या तारखेवर नाराजी व्यक्त करत हजर राहण्यास असर्मथता दर्शवली आहे. सावंतवाडी पंचायत समिती ही काँॅग्रेसच्या ताब्यात असून आमदार हे शिवसेनेचे असल्याने हा वाद सुरू आहे.सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा गेली पाच वर्षे झाली नाही. अनेकवेळा आमसभेची तारीख ठरवत असताना ज्या तारखेला आमदार केसरकर यांना वेळ नाही अशीच तारीख ठरवली जात होती. राज्यात आघाडी असताना मात्र, सावंतवाडीत काँॅग्रेस व राष्ट्रवादी काँॅग्रेसमध्ये विस्तव जात नव्हता. अशीच परस्थिती होती. त्यामुळे ही आमसभा शेवटपर्यंत झाली नाही. मात्र, अन्य तालुक्याच्या आमसभा झाल्या.आता आमदार केसरकर हे नव्याने शिवसेनेतून निवडून आले असून पंचायत समिती मात्र आजही काँग्रेसच्या ताब्यात आहे. आणि या वर्षातले पहिलेच विज्ञान प्रदर्शन हे सावंतवाडी पंचायत समितीच्यावतीने आयोजित करण्यात येते. या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक आमदारांच्या हस्ते होणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार दीपक केसरकर यांची भेट घेतली व त्यांना विज्ञान प्रदर्शनास येण्याची विनंती केली तसेच पंचायत समितीच्यावतीने ८ नोव्हेंबर ही तारीख निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आमदार केसरकर यांनी या तारखेबाबत नाराजी व्यक्त केली. माझे विधानसभेचे अधिवेशन नागपूर येथे आहे. मग मी कसा उपस्थित राहणार आणि ऐन अधिवेशनाच्या काळातच कसे विज्ञान प्रदर्शन भरवले जाते? मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे. याची आठवणही केसरकरांनी या अधिकाऱ्यांना करून दिली. मात्र, अधिकाऱ्यांनी आपण पूर्वी ४ डिसेंबर ही तारीख निश्चित केली होती. पण काही अडचणीमुळे ८ डिसेंबर ही तारीख निश्चित केल्याचे ते म्हणाले.यावर आमदार केसरकर यांनी नाराजी व्यक्त करत आपण या विज्ञानप्रदर्शनाला उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे तुम्ही तारीख बदला अन्यथा कार्यक्रम घ्या, असा सल्लाही यावेळी केसरकरांनी दिला आहे. केसरकरांच्या या पावित्र्यामुळे अधिकारी आल्या पावली निघून गेले.याबाबत गटविकास अधिकारी शरद महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, विज्ञान प्रदर्शनाची तारीख किती आहे, हे मला माहीत नाही. खात्री करून तुम्हाला माहिती देईन, असे त्यांनी स्पष्ट केले तर गटशिक्षण अधिकारी शिवाजी देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते माडखोल येथे गेल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)