शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
3
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
4
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
5
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
6
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
7
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
8
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
9
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
10
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
11
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
12
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
13
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
14
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
15
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
16
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
17
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
18
Nashik Crime: रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला उचलले, रिक्षातून नेत असताना मैत्रिणीमुळे झाली सुटका
19
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
20
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!

शाळकरी विद्यार्थी समुद्रात बेपत्ता

By admin | Updated: February 14, 2016 00:50 IST

मांडवी किनाऱ्यावर गेला होता पार्टीसाठी

रत्नागिरी : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेलेला संकेत अनंत खानविलकर (१४ वर्षे, मारुती मंदिर, रत्नागिरी) हा विद्यार्थी शहरानजीकच्या मांडवी किनाऱ्यावर समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३०च्या सुमारास घडली. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. समुद्रात बुडालेला विद्यार्थी संकेत हा शहरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये इयत्ता नववी वर्गामध्ये शिकत होता. शनिवारी दुपारी १ ते २ या वेळेत नववीचा घटक चाचणी परीक्षेचा भूगोलचा शेवटचा पेपर देऊन तो आपल्या मित्रांसह शाळेतून बाहेर पडला. त्याचा वर्गमित्र दीपक सुरेश झोरे याचा शुक्रवारी वाढदिवस होता. या वाढदिवसाची पार्टी करण्याचे मित्रांनी ठरविले. त्याप्रमाणे संकेत बरोबर निखिल विनय कांबळे, दीपक झोरे, ऋषिकेश राजेश शेलार आणि अक्षय कृष्णा वरक हे आठवडा बाजारातील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे पार्टीनिमित्त त्या पाचहीजणांनी चायनीजवर ताव मारला. हॉटेलमध्ये चायनीज खाल्ल्यावर ते सर्वजण मांडवी किनाऱ्यावरील घुडेवठार येथे समुद्रकिनारी गेले. तेथे बराच वेळ मौजमजा केल्यानंतर संकेत एकटाच समुद्रात पोहण्यासाठी उतरला. त्याच्याबरोबर अन्य दोन मित्रही पाण्यात गेले. संकेत पोहत असतानाच अचानक लाट आल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला. त्यावेळी दोन मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओहोटी असल्याने लाटेच्या पाण्याबरोबर तो खोल पाण्यात जावून बुडाल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांना रडू कोसळले. त्यांनी आरडाओरडा केला. घटना घडली त्यावेळी पाच मित्रांच्या व्यतिरिक्त तेथे अन्य कोणीही नव्हते. संकेत बुडाल्याची माहिती समजताच तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, शहर पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर, पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी, पटवर्धन हायस्कूलचे शिक्षक, भारत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आदींनी मांडवी किनाऱ्यावर घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशिरा रत्नागिरी पं.स.चे सभापती बाबू म्हाप यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. संकेत हा आपल्या आजी-आजोबांकडे राहात होता. त्याची आई मुंबईत असते. त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. (शहर वार्ताहर)