शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

शाळकरी मुलींना फूस लावून अत्याचार

By admin | Updated: February 14, 2016 00:54 IST

कणकवली तालुक्यातील दोन युवकांना अटक

कणकवली : वेगवेगळ्या गावांतील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तालुक्यातील दोन युवकांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. जगदीश बांदिवडेकर (रा. कलमठ, गावडेवाडी) आणि अजय चिंचवलकर (वय २०, रा. भरणी, तांबळवाडी) अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. जगदीश बांदिवडेकर याचा फॅब्रिकेशनच्या व्यवसाय आहे व अजय चिंचवलकर हा त्याच्याकडे कामाला आहे. अत्याचारग्रस्त एका मुलीचा मामा अजय याच्या गावात असल्याने त्याची ओळख त्या मुलीशी झाली. त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, जगदीश बांदिवडेकर याचेही अन्य गावातील मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनी आपल्या मैत्रिणींची भेट घडवून आणली होती. या दोन्ही मुली दहावीत वेगवेगळ्या हायस्कूलमध्ये शिकत आहेत. ६ फेबु्रवारी रोजी यातील एका मुलीची आजी तिला बोलल्याने ती चिडून घरातून बाहेर पडली आणि जगदीश याच्या मैत्रिणीच्या घरी गेली. या मुलीला आई-वडील नाहीत. चार दिवस ती मैत्रिणीकडे राहिली. १० फेबु्रवारी रोजी दोघीही घरातून बाहेर पडल्या. दरम्यान, पहिल्या मुलीच्या मामाने तिच्या मैत्रिणीच्या पालकांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले. मुलींच्या नातेवाइकांनी १२ फेबु्रवारी रोजी या दोघी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास करत दोन्ही मुलींसह युवकांना ताब्यात घेतले. या कालावधीत या युवकांनी दोन्ही मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अजय चिंचवलकर व जगदीश बांदिवडेकर यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बलात्काराचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दोन्ही युवकांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कलमठ येथे ठेवले दोन्ही मुली घरातून बाहेर पडल्यानंतर जगदीश बांदिवडेकर याने त्यांना कलमठ, गावडेवाडीतील शेतमांगरात आणून ठेवले होते. तेथे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही मुलींना येथून ताब्यात घेतले.