शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू

By admin | Updated: June 21, 2017 00:27 IST

मालवण येथील घटना : गौडर कुटुंबीयांवर शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क मालवण : शहरातील मेढा-राजकोट येथील आनंद रुद्राप्पा गौडर या १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा घरालगत असलेल्या विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास घडली. मालवण मेढा येथे भाड्याने राहणारे रुद्राप्पा गौडर (मूळ रा. कर्नाटक) हे पत्नी व दोन मुलांसह गेली १० ते १२ वर्षे मालवण येथे मोलमजुरी करतात. (पान १ वरून) मेढा येथील पै यांच्या घरालगत एका खोलीत गौडर कुटुंबीय गेली काही वर्षे राहत आहेत. मंगळवारी सकाळी रुद्राप्पा हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. आई व बहिणीसोबत असलेला आनंद घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीतील मासे पहायला जातो, असे सांगून गेला, तो बराच वेळ न आल्याने आई व बहिणीने त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. काही वेळानंतर आनंद हा पावसाने पूर्ण भरलेल्या विहिरीत बेशुद्ध अवस्थेत माडाच्या झावळाखाली असल्याचे समजताच मेढा येथील योगेश मुळेकर या स्कुबा डायव्हरने विहिरीत उडी मारून आनंद याला बाहेर काढले. टोपीवाला हायस्कूलकडून श्रद्धांजली आनंद हा टोपीवाला हायस्कूल येथे सातवीत शिकत होता. तो बुडाल्याची माहिती मिळताच मुख्याध्यापक प्रदीप साटम व अन्य शिक्षकांनी आनंद याच्या घरी धाव घेतली. आनंद याला शाळा भरल्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नगरसेवक गणेश कुशे, ममता वराडकर, मोहन वराडकर, दीपक पाटकर, यतीन खोत, संदीप शिरोडकर, गणेश कुडाळकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, मधलो डिसोजा व अन्य लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी रुग्णालयात धाव घेत गौडर कुटुंबीयांचे सांत्वन केले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक नागरगोजे व सिद्धेश चिपकर हे करीत आहेत. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपचारापूर्वीच मृत्यू मेढा भागात गटार खुदाईचे काम सुरू असताना महेश उर्फ डुबा गिरकर याला आनंद विहिरीत पडल्याची माहिती मिळाली. त्याने गौडर कुटुंबीय यांच्या घरी जात आनंद याला पाठीवर घेत ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आनंद याची तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले.