शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

विखुरलेल्या तावडे कुटुंबांना अतिथी भवन एकत्र आणेल

By admin | Updated: December 2, 2014 23:31 IST

विनोद तावडे : आडिवरे येथे उलगडला सत्तर वर्षांचा इतिहास

राजापूर : जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या तावडे कुटुंबीयांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम आडिवरे येथे बांधण्यात येणारे नियोजित अतिथी भवन करेल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आडिवरे येथे व्यक्त केला.क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धिनी मंडळ, मुंबईच्यावतीने आडिवरे - नवेदर येथे उभारण्यात येणाऱ्या तावडे अतिथी गृहाच्या भूमिपूजनप्रसंगी तावडे बोलत होते. त्यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, दिनकर तावडे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, सतीश शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हे तावडे अतिथी भवन उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष इंद्रनील तावडे यांच्याहस्ते पार पडले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शालेय शिक्षणमंत्र्यांनी नियोजित तावडे भवनाबाबत गौरवोद्गार काढले. देश - विदेशासह इतरत्र विखुरलेल्या तावडे कुटुंबीयांचा इतिहास फार मोठा आहे. इतिहास काळासह योगदान मोलाचे आहे. तथापी त्या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम होते. हे काम अतिथी भवन निश्चित करेल आणि त्यातूनच आपल्या इतिहासाची जाणीव तावडेंना करुन देता येईल, असा विश्वास विनोद तावडेंनी व्यक्त केला. या भवनाला सहकार्य करणारी लाखमोलाची माणसेदेखील मिळवून देवू, असे सांगताना हे भवन केवळ विनोद तावडेंचे नाही, तर समस्त तावडे कुटुंबीयांचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तावडे हितवर्धिनी मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रम राबविले जातात. त्यामध्ये समाज बांधवांसाठी वधू-वर मेळावे, वार्षिक कुलसंमेलन, वाढदिवस समारंभ, धार्मिक कार्य, गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत समाजोपयोगी मदत अशी विविध कामे मागील ७० वर्षे सुरु आहेत. भविष्यात नियोजित वास्तूमधूनदेखील असे उपक्रम मार्गी लागतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.राज्यात नवीन अधिकारीपदी आलेल्या भाजपाप्रणित देवेंद्र फडणवीस सरकारमधील शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणारे विनोद तावडे हे राजापूर तालुक्यात येणारे पहिले मंत्री ठरले. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला. (प्रतिनिधी)