शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
6
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
7
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
8
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
9
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
10
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
11
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
13
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
14
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
15
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
16
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
17
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
18
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
20
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ

सावंतवाडी अर्बन ठाणे जनता सहकारी बॅंकेत विलीनीकरण होणार ; हालचाली सुरू, अनेकांच्या ठेवी मिळण्यास मदत होणार

By अनंत खं.जाधव | Updated: June 11, 2024 23:00 IST

सावंतवाडी अर्बन बॅंक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्ह्यात आहे.  सावंतवाडी अर्बन बॅंकेवर रिझर्व्ह बँकेकडून आठ महिन्यांपुर्वी निर्बंध लादण्यात आले होते.

सावंतवाडी :रिझर्व्ह बॅंक ने निर्बंध लादलेल्या सावंतवाडी अर्बन बॅंकेच्या  विलीनीकरणाच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत. ठाणे येथील टीजेएसबी म्हणजेच ठाणे जनता सहकारी सहकारी बॅंकेत सावंतवाडी अर्बन बॅंकेचे विलीनीकरण होणार असून या संदर्भात टीजेएसबी बॅंकेची सर्वसाधारण सभा २१ जुनला होणार आहे.त्यात हा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या सर्वसाधारण सभेचा अजेंडा वृत्तपत्रात बँकेकडून प्रसिद्ध झाला आहे.

सावंतवाडी अर्बन बॅंक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्ह्यात आहे.  सावंतवाडी अर्बन बॅंकेवर रिझर्व्ह बँकेकडून आठ महिन्यांपुर्वी निर्बंध लादण्यात आले होते. बॅंकेच्या व्यवहारांवर निर्बंध आल्यानंतर बॅंक अडचणीत आली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने सभासदांकडुन तीन कोटीचे भागभांडवल जमा करण्याचा निर्धार केला. त्यानुसार दिड कोटीहून अधिक भागभांडवल जमा झाले. अद्याप बॅंकेवरील निर्बंध उठलेले नाहीत. परंतु अर्बन बॅंकेच्या विलीनीकरणाच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. यापुर्वी अर्बन बॅंक अपना सहकारी बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव होता. परंतु त्यावर शिक्कामोर्तब झाले नाही. दरम्यानच्या काळात सावंतवाडी अर्बन बॅंक अन्य बॅंकेत विलीनीकरणाबाबत चर्चा होत्या. याच दरम्यान आता सावंतवाडी अर्बन बॅंक ठाणे येथील टीजेएसबी सहकारी बॅंकेत विलीनीकरणाच्या संदर्भात हालचाली सुरु झाल्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर टीजेएसबी सहकारी बॅंकेने २१ जुनला सावंतवाडी अर्बन बॅंक व आणखी एक बॅंक विलीन करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. सावंतवाडी अर्बन बॅंक टीजेएसबी बॅंकेत विलीन झाल्यानंतर या बॅंकेचे नाव सावंतवाडी अर्बन बॅंक राहणार की‌ बदलण्यात येणार, याबाबत अद्याप तरी प्रश्नचिन्ह आहे.टीजेएसबी ही बॅंक ठाण्यातील अग्रगण्य अशी बॅक मानली जाते.त्यात विलीनीकरण झाल्यास बँकेचा फायदा होणार आहे.