शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सावंतवाडी नगरपालिका अव्वल

By admin | Updated: November 28, 2014 00:07 IST

विश्वनाथ वेटकोळी : स्वच्छता अभियानांतर्गत अधिकाऱ्यांची पाहणी

सावंतवाडी : कोकण विभागातून सावंतवाडी नगरपरिषद मालमत्तेच्या दृष्टीने व स्वच्छतेच्या दृष्टीने एक नंबर आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने आपल्या मालमत्तेची चांगली जपणूक केली आहे. त्यामुळे कोेकण विभागातून सावंतवाडी परिषदेच्या एक नंबर येवो, अशी इच्छा जिल्हा उपनिवडणूक अधिकारी रायगड अलिबाग तथा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे अध्यक्ष विश्वनाथ वेटकोळी यांनी व्यक्त केली. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे रायगड अलिबाग येथील पथक सावंतवाडी नगरपरिषदेची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान रायगड अलिबाग समितीचे अध्यक्ष विश्वनाथ वेटकोळी, कार्यकारी अभियंता अजय खोब्रागडे, जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी, सहाय्यक संचालक नगररचना जी. शिंदे, उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजनेचे जे. ए. कुलकर्णी, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेवक देवेंद्र टेंबकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, क्षिप्रा सावंत, अफरोज राजगुरू, सुभाष पणदूरकर, विलास जाधव आदी उपस्थित होते. यावेळी वेटकोळी म्हणाले, मंगळवारी सावंतवाडी शहरातील जगन्नाथराव भोसले शिवउद्यानाची पाहणी केली असता, उद्यान चांगल्याप्रकारे अद्ययावत ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर अनेक ठिकाणची पाहणी केली असता, सावंतवाडी नगरपरिषदेने शहर स्वच्छ ठेवले असून याचे श्रेय नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना जाते, असे त्यांनी सांगितले. शहरातील सांडपाणी नियोजनाचे व्यवस्थापनाचे नियोजन, हॉस्पिटलमधून अशुद्ध पाण्याचे व्यवस्थापन, कचरा नियोजन आदी गोष्टी पालिकेन योग्य प्रकारे हाताळल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून कोकणातील सावंतवाडी नगरपरिषदेची दखल घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष म्हणाले, सावंतवाडी शहरात पाणी, वीज एवढ्यावरच न थांबता शिक्षण आणि आर्थिक सुबत्ता मिळण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. आर्थिक सुबत्ता मिळाल्यास मुलांना रोजगारही उत्पन्न होईल. या दृष्टीने एमआयडीसीसारखे छोटेमोठे प्रकल्प आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे साळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले. (वार्ताहर)केसरकरांचे कौतुकआमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे कामकाज योग्य दिशेने सुरू असून शहरासह तालुक्याच्या विकासासाठी सर्व प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.