शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीवासीयांचा उद्या मूक मोर्चा

By admin | Updated: December 10, 2014 23:52 IST

कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेश कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी नागरी कृती समिती स्थापन

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात चार दिवसांपूर्वी विजेच्या तारा पडून संदीप गवस व सागर हुक्केरी यांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेश कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी नागरी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये गवस व हुक्केरी कुटुंबीयांसाठी शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन शुक्रवारी भव्य मूक मोर्चातून प्रांताधिकारी व महावितरणचे अधिकारी यांच्याजवळ देण्यात येणार आहे. निवेदनात मांडलेल्या मुद्द्यांचा पाठपुरावा या समितीतर्फे करणार असल्याची माहिती येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. सावंतवाडी नागरी कृती समितीचे अध्यक्ष उमेश कोरगावकर, उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, सहाय्यक उपाध्यक्ष राजू पनवेलकर, सचिव संजू शिरोडकर, सहसचिव दिलीप भालेकर, खजिनदार आनंद नेवगी, सहखजिनदार नकुल पार्सेकर, कायदेविषयक सल्लागार सुभाष पणदूरकर तसेच सदस्य म्हणून बाबल्या दुभाषी, सतीश नार्वेकर, बाळ चोणकर, जयवंत कुलकर्णी, संजय पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली. सावंतवाडी शहरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सावंतवाडीतील दोघांचा बळी गेला आहे. या घटनेचा दोघांच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी सावंतवाडी शहरातील नागरिकांनी एकत्र येत सावंतवाडी नागरी कृती स्थापन केली आहे.शुक्रवार १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता महामूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचा प्रारंभ उभाबाजार-विठ्ठल मंदिर येथून होणार आहे. उभाबाजार, गांधी चौक, संचयनी पॅलेस, मोती तलाव, नगर परिषदमार्गे येथील प्रांत कार्यालयाकडे या मोर्चाचे विसर्जन होणार आहे. यावेळी निवेदन सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, रिक्षा संघटनेही या मोर्चाला पाठिंबा दिल्याने शहरातील सर्व शाळांतील मुलांची गैरसोय होणार आहे. यामुळे सर्व शाळेतील संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन समितीतर्फे केले आहे. (वार्ताहर)मदतीसाठी कृती समिती करणार पाठपुरावागवस व हुक्केरी कु टुंबियांसाठी शासनाकडून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या रकमेस विलंब होऊ नये व त्या कुटुंबातील व्यक्तीस नोकरीत सामाविष्ट करून घेण्याची मागणी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या सर्व मागण्या एका महिन्यात पूर्ण होण्यासाठी या कृती समितीतर्फे आंदोलने व पाठपुरावा करण्यात येणार आहे.